Naib Tehsildar Pankaj Magar and office bearers giving written notice to farmers who are on hunger strike to get compensation.
Naib Tehsildar Pankaj Magar and office bearers giving written notice to farmers who are on hunger strike to get compensation. esakal
नाशिक

Nashik News : चुकीच्या पंचनाम्यामुळे 500 वर शेतकरी मदतीपासून वंचित; विखरणीत शेतकरी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासकीय दरबारी एखादी चूक झाली, की बळीराजावर कसा अन्याय होतो, याचा प्रत्यय विखरणीतील शेतकरी घेत आहेत. चुकीच्या व सदोष पंचनामामुळे विखरणी येथील ५०० हून अधिक शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.

शेतकऱ्यांनी सोमवार (ता. १४)पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

सायंकाळी नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर यांनी भेट घेऊन पंधरा दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (More than 500 farmers of Vikharani were deprived of government assistance due to wrong Panchnama nashik news)

माझी गटनेते मोहन शेलार यांनी उपोषण सोडविण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली. तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी, गारपीट, संततधारेने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाच्या घोषणेप्रमाणे नुकसानीचे पंचनामे झाले.

मात्र, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी अक्षम्यपणे चुकीचे पंचनामे केल्याने येथील शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी व नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचा पात्र यादीत समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नुकसानभरपाईसाठी समितीने सुमारे ६०० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केले अन्‌ वरिष्ठ पातळीवर यादी सादर करताना फक्त ५० ते ५५ शेतकऱ्यांचीच यादी सादर केली. यामुळे मर्यादित शासकीय मदतीसाठी पात्र ठरले. ९५ टक्के शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अन्यायग्रस्त सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, तसेच पंचनाम्यांची स्थळप्रत मिळावी, अपात्र शेतकऱ्यांचा पात्र यादीत समावेश करावा, मुख्यालयी राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी येथील शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा घेत परसराम शेलार, राजेंद्र शेलार, अरुण ठोंबरे, अशोक गोडसे, अशोक कोताडे, नागनाथ शेलार, सागर पगार, समाधान वाघमोडे, दत्तात्रय शेलार, योगेश पगार, नवनाथ पगार, विठ्ठल बोलीज, द्रोपदाबाई खरे, हिराबाई खरे, राजुबाई कराडे, शिवाजी वाघमोडे, समाधान बिडगर आदींनी उपोषण सुरू केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT