MSRTC bus esakal
नाशिक

MSRTC Bus : धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, पुण्यासाठी नाशिकहून दर अर्धा तासाला सुटणार एसटी!

उन्‍हाळी सुट्यांसाठी महामंडळातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

MSRTC Bus : शाळा, महाविद्यालयांना उन्‍हाळी सुट्यांना सुरवात होत असून, या कालावधीत प्रवासी संख्येत वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर नाशिकहून विविध मार्गांसाठी धावणाऱ्या एसटी बसगाड्यांच्‍या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, पुण्यासाठी दर अर्धा तासाला बसगाडी सोडली जाणार आहे. (MSRTC Bus ST Nashik every half hour for Dhule Nandurbar Sambhajinagar Pune news)

दिवाळीच्‍या हंगामात व उन्‍हाळी सुट्टीच्‍या कालावधीत प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असते. सुरक्षित प्रवास उपलब्‍ध करून देताना, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळातर्फे या कालावधीत जादा बसगाड्या सोडल्‍या जात असतात.

यंदाच्‍या उन्‍हाळी हंगामासाठी महामंडळाच्‍या नाशिक विभागातर्फे नियोजन करण्यात आलेले आहे. त्‍यानुसार नाशिक विभागामार्फत धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बोरिवली या मार्गांवर दर अर्ध्या तासाच्या अंतराने फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तसेच नाशिक -कसारा मार्गावरदेखील अतिरिक्त फेऱ्या सुरु केल्‍या आहेत. मुंबई -नाशिक मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उबरमाळी रेल्वे स्थानक ते नाशिक अशी नवीन सेवादेखील सुरु केलेली आहे. या व्यतिरिक्त सटाणा ते कल्याण फेरी प्रवाशांच्या मागणीनुसार सुरु केली आहे.

सातपूर बसस्‍थानक सेवेत दाखल

महामंडळाचे सातपूर बसस्थानक नुकतेच प्रवाशांच्या सेवेस दाखल झाले आहे. त्र्यंबक येथून विविध मार्गावर सुटणाऱ्या व त्र्यंबककडे येणाऱ्या सर्व बसगाड्या सातपूर बसस्थानक येथे जाऊन प्रवासी चढ -उतार करणार आहेत. यामुळे सातपूर परिसरातील नागरिकांची सुविधा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT