AAP protest in front of Collectorate  office
AAP protest in front of Collectorate office 
नाशिक

Nashik AAP Protest : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आप’ची निदर्शने; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे पडसाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik APP Protest : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता.२१) सक्तवसुली संचालनालयाने (इडी) अटक केल्याच्या निषेधार्थ ‘आप’ने नाशिकमध्ये निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इडी व भाजपविरोधात घोषणाबाजी केली. मेहेर सिग्नल चौकात टायर जाळत रास्ता रोको केल्यामुळे २० मिनिटे वाहतूक बंद केली. (Nashik AAP protest in front of Collectorate office marathi news)

रास्ता रोको करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी इडीने आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी सायंकाळी अटक केली. या घटनेचे पडसाद देशभर उमटत असून नाशिकमध्येही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

केजरीवाल यांच्यावर सूडबुद्धीने अटकेची कारवाई केल्याच्या निषेधार्थ इडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेधासाठी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडेअकरा वाजता रस्त्यावर उतरले. शहरातील मेहेर सिग्नल चौकात टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला. ‘नही चलेगी नही चलेगी मोदीशाही नही चलेगी, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मोदी तेरी दादागिरी नही चलेगी नही चलेगी, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है’ यांसारख्या घोषणा यावेळी दिल्या.(latest marathi news)

हिंमत असेल तर पोलिसांनी राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करावी, असे आव्हान दिले. या आंदोलनामुळे सीबीएस चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर झोपून वाहतूक रोखून धरणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून बाजूला नेले. आंदोलकांमधील अभिजित गोसावी, स्वप्नील घिया, योगेश कापसे, अमर गांगुर्डे यांना सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनप्रसंगी सुमीत शर्मा, संघटनमंत्री नविंदर अहलुवालिया, शहराध्यक्ष अमोल लांडगे, एकनाथ सावळे, प्रमोदिनी चव्हाण, निर्मला दानी, पद्माकर अहिरे, विकास पाटील उपस्थित होते.

पर्स, मोबाईलला बंदी

निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला पर्स, मोबाईल्स तसेच अन्य कोणतीही वस्तू अधिकाऱ्यांच्या दालनात घेऊन जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे जवळील सर्व वस्तू एका कार्यकर्त्याकडे सोपवून काही महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT