Encraochment Demolished by NMC esakal
नाशिक

Nashik Bus Fire Accident : मिर्ची चौकातील 'त्या' अतिक्रमणावर हातोडा

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या अपघातानंतर हॉट ब्लॅक स्पॉट' बाबत आता महापालिका प्रशासनाने तातडीने येथे सुधारणा करण्याचे काम हाती घेतले होते. या भागातील अतिक्रमण काढण्याबाबत संबधित व्यावसायिकांना अंतरिम नोटीस देण्यात आली होती. त्या अतिक्रमणावर नाशिक महानगरपालिकेने हातोडा मारला असून जणू मिर्ची हॉटेल चौकाने मोकळा श्वास घेतला असे चित्र निर्माण झाले आहे. (Nashik Bus Fire Accident Hammer on encroachment in Mirchi Chowk Nashik Latest Marathi News)

औरंगाबाद रोडवरील शनिवारी पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि आयशर गाडीच्या झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला.भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना तात्काळ कारवाई चे आदेश दिले होते.त्यानुसार नगरनियोजन विभागाने अनधिकृत व अतिक्रमित बांधकामांचे डिमार्केशन करून दिल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झाडाच्या फांद्या छाटण्यात येऊन दृश्यमानता वाढवण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती . मार्गातील ट्रान्सफॉर्मर व टर्निंग पॉईंटवरील विद्युत हटविण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. तसेच, ओव्हरहेड वायर अंडरग्राउंड करण्याबाबतही निर्णय घेतला होता.या चौकात रुंदीकरणदेखील करण्यात येणार आहे.

या चौकात स्पीडब्रेकर व डिव्हायडर बसवण्यात येतं असुन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या ड्रमला देखील रिफ्लेक्टर बसवण्यात आले आहे.काहीं व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले होते.गुरूवार (ता.२०) रोजी अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT