corona update
corona update esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २२८ कोरोनामुक्‍त

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुक्‍त रुग्‍णांची वाढती संख्या व नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची घटती संख्या दिलासादायक आहे. यामूळे दुसऱ्या लाटेत पन्नास हजारापर्यंत पोहचलेली जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या सध्या एक हजारापर्यंत खालावली आहे. बुधवारी (ता.२८) दिवसभरात सत्तर रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर २२८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. तिन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात १०६६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (Nashik-corona-update-228-patients-discharged-in-district-marathi-news)

दिवसभरात २२८ रुग्‍णांची कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात २६, नाशिक ग्रामीण क्षेत्रात ४२, मालेगावला एक तर जिल्‍हा बाहेरील एका बाधिताचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. तर दिवसभरात २२८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. जिल्‍ह्‍यातील सर्व तीन मृत हे नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक महापालिका हद्दीत कोरोनामुळे एकही मृत्‍यू झाला नसल्‍याचही दिलासादायक बाब राहिली.

दरम्‍यान सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ६७५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एक हजार २९१, नाशिक महापालिका क्षेत्रातील १९३, मालेगाव महापालिका क्षेत्रातील १९१ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५३० रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५११ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमध्ये १७, मालेगाव महापालिका क्षेत्रात एक रुग्‍ण दाखल झाला.

(Nashik-corona-update-228-patients-discharged-in-district-marathi-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT