Oil Can file photo
Oil Can file photo esakal
नाशिक

Nashik Crime News : वर्षभरात तेल-तुपाचा 5 हजार किलो साठा जप्त; अनियमित ‘री- पॅकिंग’ करणाऱ्यांवर FDA कडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : अन्न- सुरक्षा प्रशासनाने नाशिक विभागात पाच हजार ५४ किलो वजनाचा व ११ लाख ९६ हजार ६१५ रुपये किमतीचा संशयित तेल व तुपाचा साठा जप्त केला आहे. तेलाचे री- पॅकिंग करणाऱ्यांसह इतरांवर प्रशासनाकडून वर्षभरात ही कारवाई करण्यात आली.

तेलाचे पॅकिंग करणाऱ्यांवर वर्षभरात ‘एफडीए’ कडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यात तेलाच्या डब्यावर बॅच नंबर नसणे, कोड नंबर नसणे तसेच तेलाच्या डब्याचा पुनर्वापर करणे अशा अनेक बाबींचा समावेश होता. (Nashik Crime 5000 kg stock of oil ghee seized in year Action by FDA against irregular repacking marathi news)

सरकारने जुन्या डब्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच राज्य शासनाने प्लॅस्टिक उत्पादनावर पर्यावरणाच्या दृष्टीने बंदी घातली आहे. त्यामुळे जे व्यापारी तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर करीत होते तसेच जे व्यापारी प्लॅस्टिक डब्यांचा वापर करीत होते, अशांवरदेखील कारवाई करण्यात आली.

तसेच काही तुपाच्या व्यापाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली. नाशिक विभागातून तेलाचे ३२ नमुने घेण्यात आले. त्यातील २१ नमुने स्टॅण्डर्ड आढळले, तर उर्वरित ११ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. यात काही बड्या कंपन्या आपले राजकीय आर्थिक वजन वापरून कारवाई टाळण्यासाठी मंत्रालय स्थरावर चकरा मारत आहेत. (latest marathi news)

वर्षभरात १० लाख ४२ हजार ६५५ रुपये किमतीचे चार हजार ७२९ किलो तेल जप्त करण्यात आले आहे. तसेच तुपाचे ७ नमुने घेण्यात आले यापैकी ६ नमुने हे स्टॅण्डर्ड आढळले आहेत. यातील एक नमुना येणे बाकी आहे. तुपाचे एकूण १ लाख ५३ हजार ९६० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तेल आणि तूप मिळून ११ लाख ९६ हजार ६१५ रुपये किमतीचा पाच हजार ५४ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

"यापुढे या प्रकारच्या कारवाया अधिक कडक करणार आहे. नियमित तपासणी केली जाते. सुदैवाने अजूनपर्यंत कोणताही अहवाल अनियमित आलेला नाही. मात्र, सरकारच्या धोरणानुसार कारवाई सुरू राहणार आहे."

- संजय नारागुडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT