crime esakal
नाशिक

Nashik Crime News : चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : अल्पवयीन मुलांचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे गुन्हा असतानाही ते करणाऱ्या ३१ जणांविरुद्ध नाशिक सायबर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अल्पवयीन मुलांचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणे गुन्हा असतानाही ते करणाऱ्या ३१ जणांविरुद्ध नाशिक सायबर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये ८९ जणांविरोधात चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. सोशल मीडियावर अलीकडे अल्पवयीन बालकांचे अश्‍लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकार घडत आहेत. (Nashik Crime case has been registered against 31 people in case of child pornography marathi News)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोमार्फत (एनसीआरबी) ३१ संशयितांविरुद्धचे पुरावे महाराष्ट्र पोलिसांना प्राप्त झाले आहेत. सायबर पोलिस मुख्यालयातून त्यासंदर्भातील अहवालाचा ‘पेन ड्राइव्ह’ नाशिक पोलिसांना पाठविण्यात आला असून, शहर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. संशयितांनी इंटरनेटद्वारे बालकांचे अश्लील फोटो, व्हिडिओ अपलोड करून इतरांना शेअर केले आहेत.

व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्नॅपचॅटसह इन्स्टाग्रामवरून हा प्रकार केल्याचे समोर आल्याचे समजते. त्यासंदर्भात यूजर्सची माहिती, आयपी ॲड्रेस, शेअर केलेला कन्टेट यासंदर्भातील सर्व पुरावे ‘एनसीआरबी’ने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT