crime esakal
नाशिक

Nashik Crime News : आजीबाई ओरडल्याने पकडला सोनसाखळी चोरटा; नागरिकांना दिला चोप

Nashik Crime : सातपूरमध्ये पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने खेचण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूरमध्ये पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सजग असलेल्या वृद्धेने आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी पाठलाग करीत एकाला पकडून चांगलाच चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तासाभरात दोघांच्या मुसक्या आवळल्या. यातील एक संशयित अल्पवयीन असून, याप्रकरणी दोघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (nashik crime gold chain thief was caught after grandmother scream marathi news)

आनंद हरिश्चंद्र गायकवाड (२०), नितीन किरण दांडेकर (१८) यांच्या १५ वर्षीय अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघेही लेखानगर (सिडको) परिसरातील राहणारे आहेत. न्यायालयाने दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नंदा रामचंद्र कासार (६५, रा. वीर सावरकरनगर, अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. २२) रात्री साडेनऊ - पावणे दहा वाजेच्या सुमारास त्या आनंदछाया बसस्टॉपच्या गणपती मंदिराजवळून पायी जात होत्या.

त्यावेळी दुचाकीवरून संशयित तिघे आले असता, एकजण दुचाकीवरून खाली उतरला आणि वृद्‌धेजवळ जाऊन त्यांच्या गळ्यातील १ लाख ३० हजारांची सोन्याची पोत खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीमती कासार यांनी आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे दुचाकीवरील संशयितांनी पलायन केले. तर तिसरा संशयित दुचाकीच्या मागे धावला असता नागरिकांनी त्यास पाठलाग करून पकडून चांगला चोप दिला.

घटनेची माहिती समजताच सातपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. संशयिताला ताब्यात घेत, त्याच्याकडे साथीदारांबाबत चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार तासाभरात पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या. वृद्ध महिला व नागरिकांच्या सजगतेमुळे तिघा सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी सातपूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिलाच प्रयत्न फसला

संशयित हे १५ ते २० वयोगटातील असून, त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. पोलिस चौकशीमध्ये संशयितांचा सोनसाखळी खेचण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. दोघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी तर एकाला बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

iPhone 15 झाला एकदम स्वस्त! 'या' ठिकाणी मिळतोय 28 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट

Latest Marathi News Update :‘वंदे मातरम्’ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, नागपूरहून गडचिरोलीला जाताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT