Crime
Crime Sakal
नाशिक

मालेगाव : दोन सराईत गुन्हेगारांना अटक; कार, गावठी कट्टे जप्त

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील सामान्य रुग्णालयाजवळील मोसम नदी किनारी स्थानिक गुन्हे शाखा व छावणी पाेलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत नगर जिल्ह्यातून आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. पथकाने त्यांच्या ताब्यातून स्विफ्ट कार, तीन गावठी कट्टे व बारा जिवंत काडतूसे जप्त केले आहेत. गुरुवारी (ता.२४) दुपारी ही कारवाई करण्यात आली. (Nashik Crime News)

शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, अवैध शस्त्र बाळगणे, हल्ले यासह गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. त्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई संदर्भात सूचना दिल्या होत्या. गुन्हेगार सक्रीय झाले असताना पोलिसांना मिळालेले हे यश काही क्षणासाठी सुखावणारे आहे.

शहरात कारमधून काही संशयित अवैध शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरुन स्विफ्ट कार (एमएच ०२ बीजी ३५९८) ताब्यात घेतली. कारमधील दोघांच्या हालचाली संशयास्पद होत्या. गुन्हे शाखेच्या पथकाने छावणी पोलिसांच्या मदतीने संशयितांची कसून चौकशी केली. कारची तपासणी केली असता त्यात तीन गावठी कट्टे व १२ जीवंत काडतूस मिळून आले. स्थानिक गुन्हे शाखा व छावणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशीत अडथळा नको यासाठी पोलिसांनी तुर्त दोघा संशयितांचे नाव सांगण्यास नकार दिला.

ताब्यात घेतलेले दोघेजण सराईत गुन्हेगार असून याती एकावर खूनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. दुसऱ्या संशयितावरही श्रीरामपूर व परिसरात गुन्हे दाखल झाल्याचे समजते. शहरात सर्रास गावठी कट्टे वापरण्याचे प्रकार वाढले आहेत. काही संशयित परराज्यातून गावठी कट्टे आणून विक्रीदेखील करतात. एकाचवेळी तीन कट्टे, काडतुस व कार जप्त होण्याची ही बहुधा गेल्या काही वर्षातील पहिलीच वेळ आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT