Police inspecting place where murder took place near Holkar Bridge.
Police inspecting place where murder took place near Holkar Bridge. esakal
नाशिक

Nashik Crime News : होळकर पुलालगत फिरस्त्याचा खून; पंचवटी पोलिसांकडून संशयितासह 1 अल्पवयीन ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मालेगाव स्टँड समोरील डाव्या बाजूने होळकर पुलाच्या पायरीजवळ शौचालयालगत एका ४० ते ४५ वर्षीय फिरस्त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खूनाची घटना समोर आली आहे. पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार तासांतच संशयित सचिन रमेश वनकर (वय १९, रा. गोदाघाट, पंचवटी) सह एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. तर मृताची ओळख पटू शकलेली नाही. (Nashik Crime One killed near Holkar Bridge police detained 1 minor along with suspect)

शनिवारी (ता.९) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास संशयित सचिन वनकर व त्याचा अल्पवयीन साथीदार दारूच्या नशेत असताना त्यांनी होळकर पुलालगतच्या पायरीजवळ शौचास बसलेल्या फिरस्त्याला हटकत त्याच्या दिशेने दगड फेकले. यामुळे फिरस्त्यानेही दगड फेकत प्रत्युत्तर दिले.

याचे पर्यवसान हाणामारीत होऊन संशयितांनी फिरस्त्याच्या डोक्यात दगड मारुन खून केला. दोन्ही संशयितांवर आधीच चोरीचा गुन्हा दाखल आहे.(latest marathi news)

दरम्यान, रविवारी (ता.१०) सकाळच्या सुमारास याठिकाणी अज्ञात व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याबाबत काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळच असलेल्या मालेगाव स्टॅंड पोलिस चौकीत धाव घेत पोलिसांना माहिती कळविली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करीत संशयितांचा शोध घेत पेठरोडवरील अश्वमेध नगरमधून अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT