Two suspects arrested along with Gavathi Kattya from Makhmalabad Road area. including the anti-gang squad of the city crime branch.  esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद; मखमलाबाद रोडवर गुंडाविरोधी पथकाची कारवाई

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त वाढविण्यात आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. ६ : मखमलाबाद परिसरामध्ये दोघे संशयित गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळताच शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून १९ वर्षांच्या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून २ गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे असा ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Crime Two arrested sell gavthi katta on Makhmalabad Road marathi news)

अजय रमेश वाख (१९), गौरव पोपट वळवी (१९, दोघे रा. पागेवाडी, पाटाजवळ, मखमलबाद) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त वाढविण्यात आलेली आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री गुंडाविरोधी पथक मखमलाबाद परिसरात गस्तीवर असतानाच दोघे संशयित मखमलाबाद रोड परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. (latest marathi news)

त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन गावठी कट्टे व ९ जिवंत काडतुसे असा ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यंवंशी, डी.के. पवार, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, निवृत्ती माळी, गणेश नागरे यांच्या पथकाने बजावली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसागुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT