potholes on road (file photo) esakal
नाशिक

Nashik News : एकदंतनगर ते गंगेश्‍वर कॉलनी रस्त्याला कोणी वाली आहे का? संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल

Nashik News : अंबड शिवारातील एकदंतनगर ते गंगेश्‍वरकॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने पावसाळ्यात छोटे-मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंबड शिवारातील एकदंतनगर ते गंगेश्‍वरकॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने पावसाळ्यात छोटे-मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकदा लहान मुले व ज्येष्ठ नागरिक पाय घसरुन पडल्याने जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (potholes on road from Ekdanta Nagar to Gangeshwar Colony in Ambad Shivar)

या रस्त्याकडे संबंधित नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याने ‘या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही?’ असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. सन २०१७ पासून एकदंतनगर ते गंगेश्‍वरकॉलनीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्याचे काम थातूरमातूर केल्याने पहिल्या पावसातच रस्त्यावरील खडी उघडी पडली.

त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीची अनेकदा मागणी केली. परंतु त्या मागणीची ना नगरसेवकाने दखल घेतली, ना महानगरपालिकेने. मग दाद मागावी कोणाकडे असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असते, तसेच जागोजागी चिखल होत आहे. (latest marathi news)

तसेच इलेक्ट्रीक अथवा पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे न बुजविल्यामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत लहान मुले व ज्येष्ठ नागरिक असे दोन ते तीन जण पाय घसरुन अथवा खड्ड्यात पडून जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

गेल्या सात वर्षांपासून या रस्त्याची दूरवस्था असल्याने नगरसेवकांना हे दिसत नाही का अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरात उमटत असून स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेकडून तत्काळ करण्यात यावे व रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Vijay Hazare Trophy: १५ चौकार, ८ षटकार अन् दीडशतक... ध्रुव जुरेलची विस्फोटक खेळी, रिकू सिंगनेही साथ देत ठोकली फिफ्टी

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Saptashrungi Temple : वणी साप्तश्रृंगी गडावर श्री भगवती मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले; भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था!

Latest Marathi News Live Update : उल्हास नगरमध्ये महायुती फुटली; भाजपचा शिवसेनेवर आरोप

SCROLL FOR NEXT