Worship by Urban Rural Police Force on occasion of Vijayadashami esakal
नाशिक

Dussehra 2024 : विजयादशमी निमित्ताने शहर-ग्रामीण पोलिस दलातर्फे शस्त्रपूजन

Dussehra : नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शस्त्रागारात अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते पोलिस शस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विजयादशमी निमित्ताने शहर पोलिस मुख्यालयाच्या शस्त्रागारात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शस्त्रागारात अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते पोलिस शस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले. (Dussehra Arms Worship by Urban Rural Police Force on occasion of Vijayadashami )

यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, शहर मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, यांच्यासह सहाय्यक आयुक्त, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. त्याचप्रमाणे, आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते पोलिस शस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (latest marathi news )

विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजनाची परंपरा असून, या परंपरेनुसार शहर व पोलिस दलातील शस्त्रगारात असलेल्या शस्त्रसाठ्याचे पूजन करुन वंदन करण्यात आले. शस्त्रांना पुष्प अर्पण करुन प्रभावी पोलिसिंग करण्यासंदर्भात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी केल्या.

अत्याधुनिक हत्यारांचे पूजन

दाेन्हीही मुख्यालयात पारंपारिक पद्धतीने विविध शस्त्रांची मांडणी करण्यात आली होती. यात अत्याधुनिक एके -४७,  एमीपी-५, एसएलआर, पिस्तूल, ब्लाॅक पिस्तूल, अॅटाे पिस्तूल, पाॅईंट ३.८ रिव्हाॅल्व्हरसह काडतुसे मांडण्यात आली होती. याचप्रमाणे शहर-जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्येही शस्त्रपूजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT