dangerous manner on single bike
dangerous manner on single bike  esakal
नाशिक

Nashik News : जीव धोक्यात घालून कुटुंबीयांची दुचाकी ‘सवारी’; जीवघेणा अट्टहास

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एरवी दुचाकीवरून ट्रीपलसीट प्रवास करतानाचे चित्र सर्रास दिसते. परंतु आपल्या कुटुंबीयांसह दुचाकीवरून चालविण्याचा जीवघेणा प्रवास काही दुचाकीस्वार करतात. लहान मुलांसह तीन, तर कधी चार-पाच जण एकाच दुचाकीवरून धोकादायकरीत्या प्रवास करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडलीच तर यातून मोठी जीवितहानी होण्याचीच शक्यता असते. (nashik four or five people traveling in dangerous manner on single bike in city marathi news)

अशा वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असली तरी दुचाकीचालकाने तरी असा धोका पत्करणे टाळले पाहिजे. विनाहेल्मेट, ट्रिपलसीट दुचाकी चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे सर्रास दिसतात. त्यांच्याविरोधात शहर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जाते.

परंतु आपल्या कुटुंबीयांसह दुचाकीवरून प्रवास करण्याचा जीवघेणी कसरतही काही दुचाकीस्वार करताना दिसतात. काही दुचाकींवर चालकासह चार ते पाच जण प्रवास करतात. यात बहुतांशी लहान मुले असतात. अनेकदा प्रवासी बॅगाही अडकविलेल्या वा बांधलेल्या असतात.

दुर्दैवाने रस्त्यावर प्रवास करताना रस्त्याच्या खड्ड्यात दुचाकी आदळली, शेजारून जाणाऱ्या वाहनाने कट मारला, गर्दीमध्ये दुचाकी घसरून पडली तर यातून सर्वांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातही चालकाने हेल्मेट घातलेले नसते. अर्थात स्वत:च्याही जिवाची पर्वा न करता आपल्यासह आपल्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात घालून प्रवास करणे कितपत योग्य आहे, याचा विचार वाहनचालकांनी करायला हवा.

जीवघेणा आटापिटा कशासाठी?

बऱ्याचदा कुटुंबीय बाहेरगावावरून बसस्थानकावर आलेले असतात. तेथून उपनगरांमध्ये जायचे असल्याने रिक्षा वा शहर बसचा सोयीस्कर व सुखरूप प्रवास असतो. परंतु ते दुचाकीवरून त्यांच्या उपनगरीय घराकडे निघतात. असा जीवघेणा आटापिटा कशासाठी? महिला व एक मूल असे रिक्षा वा शहर बसने, तर उर्वरित दुचाकीवरून जाऊ शकत असताना जीवघेणा अट्टहास केला जातो.

पोलिसांशी घालतात वाद

जीवघेणा प्रवास करणाऱ्यांना बऱ्याचदा वाहतूक पोलिसांकडून अडविले जाते. परंतु त्या वेळी दुचाकीस्वारासह महिलाही पोलिसांशी वाद घालतात.

टाळता येण्यासारखे...

- दोनपेक्षा अधिक जणांनी दुचाकी प्रवास टाळावा

- दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर मुलांना बसवू नये

- सुरक्षित व सुखरूप प्रवासासाठी रिक्षा, शहर बसचा पर्याय निवडावा

- दुचाकीचालकाने हेल्मेटचा वापर केलाच पाहिजे

''दुचाकी चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. विशेषतः दोनपेक्षा अधिक जणांनी प्रवास करणे जिवावर बेतणारे ठरू शकते. धोकादायकरीत्या प्रवास करणाऱ्यांविरोधातही दंडात्मक कारवाई केली जाईल.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर पोलिस वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT