Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : गोड, हितकारक असेच प्रत्येकाने बोलावे! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : सत्संगती मिळणे आणि ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते, तसलीच संगत आपण पाहतो.

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : सत्संगती मिळणे आणि ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते, तसलीच संगत आपण पाहतो. विषयाचा दोष नाही, मात्र विषयी लोकांची संगत फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा-वाईट परिणाम होतो. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संत-संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असता आपल्या मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होते, तो संत जाणावा. (Everyone should speak sweetly and beneficently )

अशांची संगत मिळविण्याविषयी तळमळ असावी, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. १९) सांगितले. दिंडोरी प्रणित प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी (ता. १९) गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की विषयांची गोडी आपल्याला असते; परंतु त्यातून सुटावे, असे वाटू लागले म्हणजे भजन-पूजन करणाऱ्यांची संगत धरावी.

वाईट विचार मनात आले की नामस्मरण करावे. आपल्या सर्वाठायी भगवद् वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते. संतांना आपल्याविषयी इतकी तळमळ असते; पण ती आपल्याला कळतही नाही. संत आपल्या हिताचे सांगतात; पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. म्हणून संतांच्या बोलण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे, त्याचे कडक बोलणेही कुणाला लागणार नाही.

संतांचा पहिला गुण आहे अत्यंत निर्भयता. सर्व ठिकाणी परमेश्वर आहे, ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. संत नामस्मरण करतात, तसेच आपणही करतो; पण त्यांचे करणे नि:संशय असते. आपण मात्र नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळ्यांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात, त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो.

त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ, हितकारक असते, तसेच आपणही बोलावे. सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT