nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : सेनादलाचे 9 हजार मतदार; ‘ETPBS’ या संगणकीय प्रणालीद्वारे बजावणार हक्क

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : जिल्ह्यात सैन्य दलातील नऊ हजारांवर मतदार असून, त्यांना इटीपीबीएस या संगणकीय प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सीमारेषेवर तैनात असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. परदेशात राहणारे भारतीय नागरिक आणि सैन्यदलात असणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी मतदानाचा हक्क उपलब्ध व्हावा, यासाठी पोस्टल बॅलेट हा पर्याय उपलब्ध असतो. (Nashik Lok Sabha Election 9 thousand Senadal voters marathi news)

त्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणाहून आपले मत नोंदविता येते. आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिकली पोस्टल बॅलेट सिस्टीम संगणक प्रणालीच्या माध्यमातून सैन्य दलातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येतात.

या मतपत्रिका पोहोचल्यावर त्या मतमोजणी दिवसाच्या सकाळी आठपर्यंत पोस्टाने मिळणे अपेक्षित आहे. देशरक्षणासाठी विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या नाशिक मतदारसंघातील महिला मतदारांची संख्या २५५ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण नऊ हजार ४० सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करतील.  (latest marathi news)

विधानसभा-- पुरुष-स्त्री-- एकूण

नांदगाव १४१३/२२/१४३५

मालेगाव (म.) ८१/३/८४

मालेगाव (बा.) ७०२/१३/७१५

बागलाण ५३७/१४/५५१

कळवण-सुरगाणा १८९/३/१९२

चांदवड-देवळा ११०३/१८/११२१

येवला ८०४/२४/८२८

सिन्नर १४०५/४०/१४४५

निफाड ७४३/२४/७६७

दिंडोरी-पेठ २४८/११/२५९

नाशिक (पू.) २९५/१७/३१२

नाशिक (म.) ९७/९/१०६

नाशिक (प.) १९०/१८/२०८

देवळाली ६७८/३०/७०८

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर ३००/९/३०९

एकूण ८७८५/२५५/९०४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT