During the procedure in the radiation center.
During the procedure in the radiation center. esakal
नाशिक

Nashik Mango Export : कोकणाचा राजा लासलगावमार्गे परदेशात; पहिल्याच दिवशी 28 टन आंबे अमेरिकेला रवाना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Mango Export : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरवात झाली असून, सात हजार ५०० बॉक्समधून २८ टन आंबा हा यूएसएला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. (Nashik Mango Export mangoes of Konkan abroad via Lasalgaon marathi news)

भारतात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी यंदाही लासलगावमार्गे झाली. आज २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहेत. गेल्या वर्षी एकट्या अमेरिकेत एक हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली होती.

गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच सुरू आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.

लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ ला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्रात हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता कांद्याबरोबर मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यांमध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. (latest marathi news)

विकिरण प्रक्रिया म्हणजे..?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रिया ही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

या देशात मागणी

मलेशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यू यॉर्क, कॅलिफोर्निया, सन फ्रान्सिसको, लॉस एंजिल्स, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन.

या जातीच्या आंब्यांचे विकिरण होऊन परदेशी पाठविले जातात ः

हापूस, अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशरा, बेंगनपल्ली, लंगडा.

२००७ पासून येथील केंद्रातून निर्यात झालेले आंबे.

सन --- निर्यात (टन).

२००७-- १५७.

२००८-- २७५.

२००९-- १२२.

२०१०-- ९६.

२०११-- ८५.

२०१२-- २१०.

२०१३-- २७५.

२०१४-- ३२८.

२०१५-- ३२८.

२०१६-- ५६०.

२०१७-- ६००.

२०१८-- ५८०.

२०१९-- ६८५.

२०२०-- कोरोना Nil.

२०२१-- कोरोना Nil.

२०२२-- ३६०.

२०२३-- १०००

२०२४ (४ एप्रिल २०२४)-- २८ टन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT