Exciting moments during the MRF Mogrip Supercross Championship race. esakal
नाशिक

Nashik MRF Supercross: एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेत सी. डी. जिनान विजेता! हवेत झेपावणाऱ्या दुचाकींचा क्रीडाप्रेमींनी अनुभवला थरार

Nashik News : एमआरएफ मोग्रीप सुपरक्रॉस चॅम्‍पियनशिप स्‍पर्धेत २०२४ च्‍या हंगामातील पहिली फेरी शनिवारी (ता.९) नाशिकमध्ये झाली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एमआरएफ मोग्रीप सुपरक्रॉस चॅम्‍पियनशिप स्‍पर्धेत २०२४ च्‍या हंगामातील पहिली फेरी शनिवारी (ता.९) नाशिकमध्ये झाली. ठक्‍कर डोम येथे भरविलेल्‍या ऑटोथॉन प्रदर्शनाच्‍या परिसरात झालेल्‍या स्‍पर्धेतील हवेत झेपावणाऱ्या दुचाकींचा थरार क्रीडाप्रेमींना बघायला मिळाला. दरम्‍यान टीव्‍हीएस रेसिंगच्‍या सी. डी. जिनान याने पहिल्‍या फेरीत विजेतेपद मिळविताना यंदाच्‍या हंगामातील विजेतेपदासाठी दावेदारी केली आहे. (Nashik MRF Supercross competition marathi news)

एमआरएफ मोग्रीप सुपरक्रॉस चॅम्‍पियनशिप स्‍पर्धेतील पहिल्‍या फेरीतील सर्वसाधारण विजेता सी. डी. जिनान याच्‍यासह विविध गटातील विजेते स्‍पर्धक.

अत्‍यंत चुरशीच्‍या झालेल्‍या या स्पर्धेत दुचाकीस्‍वारांचे कसब पणाला लागले होते. यंदा प्रथमच प्रकाशझोतात झालेल्‍या या स्‍पर्धेत चालकांना आपली कामगिरी उंचावण्यात कौशल्‍यांचा उपयोग करावा लागला. एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेनिमित्त क्रीडाप्रेमींच्‍या डोळ्यांची पारणे फिटली.

सुपरक्रॉस स्पर्धा आयोजनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने नाशिकमध्ये प्रथमच प्रकाश झोतात स्‍पर्धा झाली. त्‍यातच नाशिक ढोलांचा गडगडाट आणि फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधी ठरली. एसएक्स १ या विदेशी बनावटीच्या दुचाकीसाठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळाली.

टीव्हीएस रेसिंग टीमच्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगत वाढवणारा ठरला. विदेशी बनावटी तसेच देशी वाहनांचा विविध गटांतून स्‍पर्धेत सहभाग होता. एकूण नऊ गटांत झालेल्‍या या स्‍पर्धेत सुमारे ८९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे आयोजन गॉड्स्पीड रेसिंग संस्थेने केले होते. श्याम कोठारी, सूरज कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्‍पर्धा झाली.

चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वाढविली रंजकता

ऑस्ट्रियाचे थॉमस आणि स्वित्झलँड येथील व्हिवियान या दोन चालकांनी आपल्या विदेशी बनावटीच्या वाहनांद्वारे ‘फ्रीस्टाईल मोटोक्रॉस’चे प्रात्यक्षिके केली. यामुळे रंजकता वाढली. अनेकांनी या हवेत झेपावणाऱ्या दुचाकींची छायाचित्रे, व्हिडिओ घेताना सोशल मिडीयावर व्‍हायरल केले. तर प्रात्यक्षिक पार पडल्‍यानंतर चालकांसोबत छायाचित्र काढण्यासाठी चाहत्‍यांनी गर्दी केली होती. (Latest Marathi News)

स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा :

(अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने व कंसात टिमचे नाव)

* क्लास १-एसएक्स २,५०० सीसीपर्यंतः सी. डी. जिनान (टीव्‍हीएस रेसिंग), श्र्लोक घोरपडे (सातारा), ऋग्‍वेद गारगुजे (टीव्‍हीएस रेसिंग).

* क्लास २- एसएक्स २-५०० सीसीपर्यंतः वालमेर वॅलेंटीनो (कोची), अमल वर्गिस (एर्नाकुलम), अलेस (गोवा).

* क्लास ३- नोव्हाईस २६० सीसीपर्यंत: करण कुमार (हिरो मोटोर स्‍पोर्टस), शैलेशकुमार (टीव्‍हीएस रेसिंग), निथयान एल (टीव्‍हीएस रेसिंग).

* क्लास ४- लोकल्स २६० सीसीपर्यंत: रोहित शिंदे

(बारामती), राजेश स्‍वामी (पेन), श्‍यामलाल परदेशी (पुणे).

* क्लास ५- इंडियन एक्सपर्टस्‌ २६० सीसीपर्यंत: इम्रान पाशा (टीव्‍हीएस रेसिंग), सचिन डी. (टीव्‍हीएस रेसिंग), अरुण टी. (हिरो मोटरस्‍पोर्टस).

* क्लास ६- प्राव्हेट एक्स्पर्ट २६० सीसीपर्यंत: उदयकुमार एम. (कोईंबतूर), अभी नाथ (थरीशूर), इर्शाद महम्मद (चेरुथुरुथी).

* क्लास ७- ज्‍युनिअर एसएक्स २५० सीसीपर्यंत: जितेंद्र सांगवे (इचलकरंजी), इक्‍टोर इझॅक (कोची), विल्‍मर वॅलेंटीनो (कोची).

* क्लास ८ ज्‍युनिअर एसएक्स१०० सीसीपर्यंत: यश शिंदे (पुणे), अक्षत हुपळे (पुणे), सुजन जे. (कोईंबतुर).

* क्‍लास ९ः ज्युनिअर एसएक्‍स३ः ६५ सीसीपर्यंतः चैतन्‍य जोशी (पुणे), भैरव सी (बंगळूर), विष्णू व्‍ही (इरोड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT