Nashik Municipal election sakal
नाशिक

नाशिक मनपा निवडणूक | कामटवाडे गावाची भूमिका ठरणार निर्णायक

विक्रांत मते

नाशिक : पूर्वीच्या प्रभाग २५ चे दोन भाग होऊन प्रभाग ३१ व ३२ ची निर्मिती करण्यात आली. प्रभाग ३२ मध्ये कामटवाडे गावाचा जवळपास सर्वच भाग समाविष्ट झाल्याने या गाव व परिसरातील दहा ते बारा हजार मतदार या प्रभागाचा मतदार ठरवतील. या प्रभागाचे आणखी एक वैशिष्टे कसमादेच्या रूपात आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासाठी शिवसेनेच्या मतदारांना निवडून आणणे प्रतिष्ठेचे राहणार आहे. त्याला कारण म्हणजे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील एक संपूर्ण गावच या प्रभागात वसले असून, या गावाचे जवळपास आठशे मतदान आहे.

आजी- माजी तीन नगरसेवकांचे वर्चस्व, मराठा मतदानाचा अधिकचा टक्का व कामटवाडे गावासह अभियंतानगर, त्रिमूर्ती चौक, इंदिरानगरी व शिवशक्ती चौक या परिसरातील दहा ते बारा हजार मतदारांचा समावेश ही या प्रभागाची वैशिष्टे आहेत. कामटवाडे गाव मटालेंचे असल्याने थोडक्यात ते ठरवतील तोच उमेदवार लीड घेईल. मागील निवडणुकीत मनसे व शिवसेनेत लढत झाली होती. शिवसेनेच्या उमेदवाराला पाचशे मते अधिक पडल्याने विजयी झाले. परंतु, यंदा भाजप व शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढत होईल. पॅनलच्या निर्मिती होणार असली तरी व्यक्ती विशेषत्वाला येथे महत्त्व आहे. त्यामुळे दोन्हीकडून संपूर्ण पॅनल निवडून येईल, असे सध्या तरी कुठल्याच पक्षाकडून ठोस असे सांगितले जात नाही. पूर्वीच्या प्रभाग २५ मध्ये समाविष्ट असलेला हेगडेवारनगरचा जवळपास एक हजार मतांचे पॉकेट प्रभाग ३१ ला जोडले गेल्याने भाजपच्या पॅनलमध्ये जुन्याजाणत्या व गावकीत उठबस करणाऱ्या व्यक्तीला स्थान देणे महत्त्वाचे ठरणार आहे. सद्यःस्थितीत शिवसेना व भाजपकडे तेवढेच तुल्यबळ उमेदवार असल्याने येथील लढत रंगतदार ठरेल.

हे आहेत इच्छुक

श्‍यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, राकेश ढोमसे, अनिल मटाले, नामदेव पाटील, भरत पाटील, नितीन देवरे, सुमीत शर्मा, हेमंत नेहेते, सचिन कमानकर, योगिता पताडे, अरुण निकम, धरम गोविंद, दिनेश मोडक, साधना मटाले, अनिता मोरे, गणेश अरिंगळे, राहुल कमानकर, प्रकाश अमृतकर, किरण गाडे- देशमुख, पवन मटाले, भूषण देवरे, धर्माजी बोडके, प्रदीप पताडे, किरण शिंदे, अरुणा पाटील, चित्रा अमृतकर, अर्चना शिंदे, उदय मुळे.

प्रभागाची व्याप्ती-

कामटवाडे, धन्वंतरी कॉलेज, शिवशक्ती चौक.

* उत्तर- ब्राम्हणी अपार्टमेंट इमारतीमागील नंदिनी नदीपासून सिडको स्मशानभूमी लगतच्या नाल्यापर्यंत.

* पूर्व- नंदिनी सिडको स्मशानभूमीलगतच्या नाल्याने गोपीनाथ मुंडे गार्डनपर्यंत पुढे पूर्वेकडे निळकंठेश्वर महादेव मंदिर रस्त्यावरील इमारतींच्या पाठीमागील हद्दीने कामटवाडे यूपीएससीपर्यंत. कामटवाडे यूपीएचसी सोडून अंतर्गत रस्त्याने उंटवाडी अंबड लिंकवरील त्रिमूर्ती वाहन बाजारापर्यंत, दक्षिणेकडील मोरे हॉस्पिटलपर्यंत.


*दक्षिण- अंबड लिंकरोडवरील मोरे हॉस्पिटल समोरील रस्त्याने पश्चिमेकडे येऊन संजिवनी हॉस्पिटल समोरील इमारतीपर्यंत, स्टार मोबाईल रिपेरींग सेंटर इमारत सोडून दोन इमारतींमधून उत्तरेकडे जाऊन खुल्या जागेतून मीनाताई ठाकरे शाळेसमोरील कामटवाडे रस्त्यापर्यंत.

*पश्चिम- मीनाताई ठाकरे शाळेसमोरील कामटवाडे रस्त्याने उत्तरेकडे जाऊन मथुरा लॉन्सपर्यंत, मथुरा लॉन्स सोडून पुढे नाल्याच्या हद्दीने उत्तरेकडे कृष्ण दर्शन अपार्टमेंट, मीनल अपार्टमेंट सोडून दोन्ही इमारतींच्या मधून देवराम पाटीलबुवा मोगळ मार्डन सोडून उत्तरेकडे रस्त्याने सुनील फॅब्रिकेशनपर्यंत, सुनील फॅब्रिकेशन पासून पुढे महालक्ष्मी एजन्सी अपार्टमेंट सोडून व ब्रम्हणी अपार्टमेंटसह नंदिनी नदीपर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT