Charging Station
Charging Station esakal
नाशिक

Nashik NMC Charging Station : आचारसंहिता संपल्यानंतर चार्जिंग स्टेशन उपलब्ध! शहरात 106 जागा निश्चित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत नाशिक महापालिकेकडून शहरात प्रस्तावित १०६ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनपैकी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २० चार्जिंग स्टेशनच्या उभारणीला प्रारंभ झाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर नाशिककरांना महापालिकेचे चार्जिंग स्टेशन उपलब्ध होणार आहे. चार्जिंग स्टेशन उत्पादित कंपनीलाच काम देण्यात आले आहे. (Nashik NMC Charging station marathi news)

पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच प्रदूषणमुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्‍यकता आहे. शहरात महापालिकेचे एकही चार्जिंग स्टेशन नाही.

नवीन इमारतींमध्ये आता बांधकाम व्यावसायिकांकडून व्यवस्था केली जात आहे. तूर्त सोसायटीच्या पार्किंगमधील वीजजोडणी माध्यमातून वाहने चार्जिंग केली जातात. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने तेवढ्या प्रमाणात ई-चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे.

त्यामुळे नॅशनल क्लीन एअर पॉलिसी (एन-कॅप) अंतर्गत केंद्र सरकारने निधी दिला आहे. ई- चार्जिंग स्टेशनकरिता महापालिकेने शहरात १०६ जागा निश्चित केल्या. यात पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.

स्थायी समितीने ७.४३ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तीन महिन्यात पहिल्या टप्प्यातील वीस चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आचारसंहिता संपेपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली.

येथे होतील चार्जिंग स्टेशन

- महापालिका मुख्यालय (राजीव गांधी भवन)

- महापालिका पश्चिम विभागीय कार्यालय.

- महापालिका पूर्व विभागीय कार्यालय.

- नाशिक रोड विभागीय कार्यालय.

- सातपूर विभागीय कार्यालय.

- पंचवटी विभागीय कार्यालय.

- सिडको विभागीय कार्यालय.

- तपोवन बस डेपो.

- अमरधाम फायर स्टेशन पंचवटी.

- सातपूर फायर स्टेशन.

- राजे संभाजी स्टेडिअम सिडको.

- महापालिका बिटको हॉस्पिटल, नाशिक रोड

- कृषिनगर जॉगिंग ट्रॅक.

- बी. डी. भालेकर मैदान.

- प्रमोद महाजन उद्यान, गंगापूर रोड.

- महात्मानगर क्रिकेट मैदान.

- दादासाहेब फाळके स्मारक.

- गणेशवाडी भाजी बाजार इमारत.

- लेखानगर महापालिका जागा.

- अंबड लिंक रोडवरील महापालिका मैदान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT