Water Supply
Water Supply esakal
नाशिक

Nashik News : ओझरचा पाणीपुरवठा 15 एप्रिलपासून दिवसाआड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ओझरचा विस्तार झपाट्याने वाढत असून, एक लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ ३८ लाख लिटरचा एक, पाच-पाच लाख लिटरचे दोन जलकुंभ आहेत. पालखेड धरणातून होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने ओझरची तहान भागत नव्हती. २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून तीन ९० एचपी पंपऐवजी आता १५० एचपी पंच बसविण्याचे काम जलजीवन मिशन अंतर्गत होत आहे. (Nashik Ozar water supply a day after day from 15th April)

३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण होणार आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी दिली. ओझरला दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ओझर परिसरात नव्याने होत असलेली उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ भरत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

टिळकनगरमध्ये २८लाख लिटर जलकुंभ, शेजवळ वाडीत ५ लाख लीटर व दहावा मैल येथील २.५ लाख लीटर जलकुंभ आहेत. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडताना जॅकव्हेलची लेव्हल पाहणे गरजेचे होते. मात्र, पाटबंधारे विभागाने जॅकवेलच्या लेव्हलकडे लक्ष न देता पाणी सोडले.

यामुळे जॅकवेलमधील पाण्याची लेव्हल कमी होऊन दोन पंपाऐवजी एकच पंप काम करीत आहे. त्यामुळे ओझरला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी पूर्णतः भरली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याची चर्चा आहे.

"पालखेड धरणावर सर्व अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. अनेक त्रुटी असताना, तांत्रिक बाबी तपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ दखल घेण्याचे सांगितले. ९० एचपीऐवजी तीन १५० एचपी पंप बसविवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३१ मार्चपर्यंत ही सर्व पंप सुरळीतपणे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ओझरकरांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार आहे."-अनिल कदम, माजी आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT