SET Exam
SET Exam esakal
नाशिक

SET Exam: भावी प्राध्यापकांना पेपर-2 सोडविताना फुटला घाम! नाशिकमध्ये सेट परीक्षेला 17 केंद्रांवर 86.84 टक्‍के उपस्‍थिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्‍यस्‍तरीय पात्रता परीक्षा (सेट) नाशिकमधील १७ केंद्रांवर रविवारी (ता. ७) झाली. या परीक्षेला प्रविष्ट नऊ हजार ५७ पैकी सात हजार ८६५ परीक्षार्थींनी उपस्‍थित राहून परीक्षा दिली; तर एक हजार १९२ परीक्षार्थींनी दांडी मारली. उपस्‍थितीचे प्रमाण ८६.८४ टक्‍के राहिले. दरम्‍यान, पेपर क्रमांक एकच्‍या तुलनेत विशेष विषयांवर आधारित पेपर क्रमांक दोनची काठीण्यपातळी अधिक राहिल्याने भावी प्राध्यापकांना चांगलाच घाम फुटला होता. (Nashik 87 percent attendance at 17 centers for set exam news)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोव्‍यात सेट परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेला राज्‍यभरातून एक लाख २५ हजार परीक्षार्थी सामोरे गेले. यंदाची सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाइन परीक्षा असल्‍याने परीक्षार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली होती. दरम्‍यान, रविवारी सकाळी दहा ते अकरादरम्‍यान पेपर क्रमांक एक झाला; तर सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत पेपर क्रमांक दोन झाला. परीक्षार्थींमध्ये कमालीचा उत्‍साह होता. महिला उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय होते.

सर्व परीक्षार्थींसाठी पेपर क्रमांक एक सारखाच होता. पेपर क्रमांक दोन हा त्‍या-त्‍या परीक्षार्थींच्‍या विशेष विषयावर आधारित होता. आधीच तप्त उन्‍हामुळे उकाडा वाढलेला असताना प्रश्‍नपत्रिकेतील कठीण प्रश्‍न पाहत अनेक परीक्षार्थींना घाम फुटत होता.

परीक्षेनंतर चर्चेत रमले परीक्षार्थी...

परीक्षा आटोपून बाहेर पडल्‍यावर अनेक परीक्षार्थी आपल्‍या मित्रांच्‍या समूहासह प्रश्‍नपत्रिकेवर चर्चा करण्यात व्‍यस्‍त दिसले. एकमेकांच्‍या उत्तरांची तुलना करताना अचूक उत्तरांबाबत चर्चा रंगली होती.  (latest marathi news)

शहरनिहाय ‘सेट’च्‍या उपस्‍थितीची टक्‍केवारी अशी :

शहर उपस्‍थितांची टक्‍केवारी

मुंबई ७९.६४

पुणे ८२.०५

नाशिक ८६.८४

कोल्‍हापूर ८८.९९

जळगाव ८७.६९

धुळे ८६.४६

छत्रपती संभाजीनगर ८४.१७

नांदेड ८५.३४

अमरावती ८८.४८

नागपूर ८५.०९

गोवा ८६.५५

सोलापूर ८३.७५

चंद्रपूर ८९.७२

गडचिरोली ८९.८४

अहमदनगर ८७.२१

रत्‍नागिरी ८६.४२

परभणी ८७.३५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT