Pupils hanging water on a tree in Zilla Parishad Primary School here for parties.
Pupils hanging water on a tree in Zilla Parishad Primary School here for parties. esakal
नाशिक

Nashik News : उंबरदे प्राथमिक शाळेत ‘पक्षी वाचवा अभियान’; दुष्काळाची चाहूल लागताच शिक्षक, विद्यार्थ्यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दुष्काळी परिस्थिती अन् उन्हाळ्याची चाहूल लागल्याने माणसांसोबत पक्ष्यांचीही पाण्यासाठी अन् धान्यासाठी धावाधाव सुरू होते. हे लक्षात घेत उंबरदे (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पक्षी वाचवा अभियान’ हा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. शिक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविला जात आहे. (Nashik Save Birds Mission in Umbarde Primary School marathi news)

मुख्याध्यापक शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरदे शाळा सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असते. पर्यावरणवादी असलेली मुले पुस्तकातील जग प्रत्यक्षात जगतात. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आपल्याजवळील टाकाऊ डब्यांना योग्य काप देत त्यांनी झाडाच्या पायथ्याशी व झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.

येथील मुलांची ‘पक्षी वाचवा अभियान’ टीम प्रत्यक्षात पुढाकार घेत्र असून, त्यांना शिक्षकांची साथ मिळत आहे. यात संगीता पवार, देवेंद्र वायडे व पालकांचा सहभाग आहे. निसर्गाचा सवंगडी पक्षी आपला मित्रच आहे. हे विद्यार्थ्यांनी अनुभवले आहे. आपल्यासोबत पाखरांची शाळा देखील मुले अनुभवत आहेत. (latest marathi news)

मुलांनी प्लॕस्टीक डब्बे, बाटल्या, फुटके माठ, तार, दोरा, सुतळी या साधनांचा उपयोग केला आहे. गावातील पर्यावरणवादी युवकांनीही यासाठी मदत करून पुढाकार घेतला आहे. ठिकठिकाणी मुलांनी श्रमदानातून पाणवठे करत तयार केले आहेत. पक्षी संवर्धन काळाची गरज असून, त्यासाठी चिमुकल्यांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. मुले ‘पक्षी वाचवा अभियाना’करिता जागृती करणार आहे.

''दुष्काळी परिस्थिती आणि दाहक उन्हाळा यात विद्यार्थी, पालक व शिक्षक राबवित असलेला ‘पक्षी वाचवा अभियान’ हा उपक्रम पर्यावरणाचे संवर्धन राखण्यास मदत करणारा आहे. नवनवे सामाजिक, शैक्षणिक, तंत्रस्नेही व पर्यावरणवादी उपक्रम उंबरदे शाळा सातत्याने राबवित असते.''- एस. ए. निकम, शिक्षण विस्तार अधिकारी, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT