Nashik News : कोविड काळातील अनुभव भविष्यात संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी : आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

Nashik : कल्याण डोबिंवलीची लोकसंख्या २५ लाख त्यात शासकीय रूग्णालय केवळ दोनच, डॉक्टरांची संख्या कमी, ऑक्सीजनचा तुटवडा, इंजेक्शन, बेडची कमतरता आणि शासनाने सांगितले तुम्हीच आता सांभाळा.
In a program organized by Girna Gaurav Foundation, Dr. While releasing the book "Captain Cool" written by Gautam Kotwal based on Vijay Suryavanshi's work on Sunday, Open University Vice-Chancellor Dr. Sanjiv Sonwane.
In a program organized by Girna Gaurav Foundation, Dr. While releasing the book "Captain Cool" written by Gautam Kotwal based on Vijay Suryavanshi's work on Sunday, Open University Vice-Chancellor Dr. Sanjiv Sonwane.esakal

Nashik News : कल्याण डोबिंवलीची लोकसंख्या २५ लाख त्यात शासकीय रूग्णालय केवळ दोनच, डॉक्टरांची संख्या कमी, ऑक्सीजनचा तुटवडा, इंजेक्शन, बेडची कमतरता आणि शासनाने सांगितले तुम्हीच आता सांभाळा. ही खरी स्वत:ला सिध्द करण्याची वेळ होती आणि डॉक्टरांची आर्मी तयार होत गेली. सुरवातीला १५ डॉक्टर सहभागी झाले नंतर तीच संख्या ३५० पर्यंत पोहचली. (Nashik Commissioner Dr Vijay Suryavanshi statement on Experiences during covid period marathi news )

आज चार वर्ष होत येतील भविष्यात कोविड महामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर, अनुभवांचा संदर्भ असावा म्हणून ग्रंथ निर्मिती केले असल्याचे मत कल्याण डोबिंवली मनपाचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित कॅप्टन कुल ग्रंथाच्या दुसर्या मराठी तर पहिल्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मु शं औरंगाबादकर सभागृहात करण्यात आला.

त्यावेळी डॉ सुर्यवंशी बोलत होते. डॉ सुर्यवंशी म्हणाले, महानगरपालिकेला पोलिसांची साथ मिळाली नसती तर व्यवस्थापन करणे अवघड होते. कोविड एक लढाई होती या लढाईत सामील नाही झालो तर आयुष्यभर पस्तावा करण्याची वेळ येईल एवढचं डोक्यात होते. एका दहा वर्षाच्या मुलीचा आलेला फोन, रूग्णांची तळमळ जवळून बघितली काही काळानंतर घटना विस्मरणात जातील त्यासाठी ग्रंथ महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. (latest marathi news)

In a program organized by Girna Gaurav Foundation, Dr. While releasing the book "Captain Cool" written by Gautam Kotwal based on Vijay Suryavanshi's work on Sunday, Open University Vice-Chancellor Dr. Sanjiv Sonwane.
Nashik News : पथविक्रेता निवडणूक लोकसभेमुळे लांबणीवर; 40 लाखाच्या खर्चास महापालिकेकडून मंजुरी

कॅप्टन कुल ग्रंथाचे लेखक गौतम कोतवाल यांनी आयुक्तांनी फायटर म्हणून कल्पकतेने परिस्थिती हाताळली तिची दखल पंतप्रधान कार्यालयाने तर त्याचा संदर्भ ग्रंथ तयार करण्याची इच्छा झाली. भविष्यात हा ग्रंथ डिझास्टर मॅनेजमेंटसाठी गाइड म्हणून उपयोगी होईल असे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी डॉ बी जी वाघ, मनपा आयुक्त डॉ संजय करंजकर, कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील, मविप्र सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ विशाल गुंजाळ, लेखक गौतम कोतवाल, वैद्य विक्रांत जाधव, डॉ आरती सुर्यवंशी उपस्थित होते. दरम्यान जिल्हयातील वैद्यकीय सेवाव्रतांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक आश्विनी बोरस्ते यांनी तर रविंद्र मालुंजकर यांनी सुत्रसंचालन केले.

In a program organized by Girna Gaurav Foundation, Dr. While releasing the book "Captain Cool" written by Gautam Kotwal based on Vijay Suryavanshi's work on Sunday, Open University Vice-Chancellor Dr. Sanjiv Sonwane.
Nashik News : निफाड तालुक्यातील गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा; फेब्रुवारी अखेर 133 जलस्रोतातील पाणी पिण्यायोग्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com