Along the Taharabad road here, the animals have taken the support of the tree to escape from the scorching sun. esakal
नाशिक

Nashik Summer Heat : आग ओकणाऱ्या सूर्यामुळे पशुपक्षी घायाळ; हिटस्ट्रोक वाढल्याने उन्हापासून करा बचाव

Summer Heat : संपूर्ण मोसम खोऱ्यात तापमान चांगलेच वाढल्याने उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आग ओकणाऱ्या सूर्याच्या प्रकोपामुळे नागरिकांसह पशुपक्षी कमालीचे हैराण झाले आहे.

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat : संपूर्ण मोसम खोऱ्यात तापमान चांगलेच वाढल्याने उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आग ओकणाऱ्या सूर्याच्या प्रकोपामुळे नागरिकांसह पशुपक्षी कमालीचे हैराण झाले आहे. गॉगल, टोपी, स्कार्फ, रुमाल घेऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडताना दिसत आहे. या वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही होत आहे. वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांवरही होतो. (Nashik Summer Heat Animals injured by scorching sun marathi news)

त्वचारोग, हिटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते. तापलेल्या उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही त्रास होत आहे. भूक कमी लागते, तहानेने ते व्याकूळ होतात. असह्य उन्हाच्या झळामुळे हिटस्ट्रोक वाढल्याने अनेक पक्षी मूर्च्छितावस्थेत पाहायला मिळतात. त्यामुळे वाढत्या उन्हापासून पशुपक्ष्यांची काळजी घेण्याचा सल्ला एकलहरे (जायखेडा) येथील पशुवैद्यकीय अभ्यासक डॉ. नवल खैरनार यांनी दिला आहे.

''तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशूपक्षी सावलीत बसतात; मात्र सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. यामुळे त्यांना दम लागून हिटस्ट्रोक बसतो.''- डॉ. नवल खैरनार, पशुवैद्यकीय अभ्यासक. (latest marathi news)

पशुपक्ष्यांची अशी घ्या काळजी...

- घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटक्यासाठी घेऊन जावे.

- चिकन, मटण, मासे हे प्राण्यांचे आवडते खाद्यपदार्थ असले तरी उन्हाळ्यात हे पदार्थ त्यांना सारखे देऊ नये.

- मांसाहारी पदार्थ पचण्यास जड असतात. त्यामुळे प्राण्यांना जुलाब, उलटीसारखे आजार होतात.

- उन्हाळ्यात प्राण्यांना खायला मोजकेच आणि पोषक आहार द्यावे.

- प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे.

- खिडकीवर, बाल्कनीत छोटेखानी भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. दोन-तीन तासांनंतर हे पाणी बदलावे.

- पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.

- आजारी पडलेल्या प्राण्यांना स्वत:च उपचार देण्याऐवजी पशुवैद्यकांचा सल्ला नेहमी घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT