Centrally located 'S to G' and 'Swami Collection' fire broke out on Sunday night.  esakal
नाशिक

Nashik Fire Accident : सटाण्यात दोन दुकानांना आग; लाखोंचे नुकसान

Nashik News : हर पोलिस चौकीसमोरील ‘एस टू जी’ व ‘स्वामी कलेक्शन’ या दोन कपड्यांच्या दुकानांना रविवारी (ता. ३१) रात्री आठला आग लागली

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : शहर पोलिस चौकीसमोरील ‘एस टू जी’ व ‘स्वामी कलेक्शन’ या दोन कपड्यांच्या दुकानांना रविवारी (ता. ३१) रात्री आठला आग लागली. आगीत दोन्ही दुकानांतील लाखो रुपयांचा माल खाक झाला असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. (Nashik Two shops on fire in Satana news)

शहरातील वृंदावन मार्केटशेजारी शादाब तांबोळी यांचे ‘एस टू जी’, तर कृष्णा जगताप यांचे ‘स्वामी कलेक्शन’ दुकान आहे. रात्री आठला या दोन्ही दुकानांतून अचानक धूर येऊ लागला. काही कळण्याच्या आतच आगीचे लोट पसरू लागले. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक व नागरिकांची एकच धावपळ उडाली.

सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलास माहिती देताच तत्काळ अग्निशमन बंब दाखल झाला. दोन अग्निशमन बबांच्या तीन फेऱ्या, तर टँकरच्या चार फेऱ्यांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, आग नियंत्रणात आणण्यात यश येत नव्हते. त्यानंतर देवळा येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीचे लोण दुकानांमागील डॉ. आंबेडकरनगर परिसरातील शॉपिंग मार्केटपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  (latest marathi news)

दरम्यान, आगीचे वृत्त सोशल मीडियाद्वारे शहरात पसरतातच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. महावितरण कंपनीने समयसूचकता दाखवून तत्काळ शहरातील वीजपुरवठा खंडित केला.

हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

आगीत जळालेली दुकाने हिंदू व मुस्लिम बांधवांची आहेत. सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने परिसरात सायंकाळी मोठी वर्दळ होती. घटना घडल्यानंतर धार्मिक भेद विसरून हिंदू व मुस्लिम बांधव आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे आले. त्यातून हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

Latest Marathi News Live Update : ऐन दिवाळीमध्ये कोल्हापुरातील गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

SCROLL FOR NEXT