nashik unlock
nashik unlock esakal
नाशिक

Nashik Unlock : आठवड्याभरापासून ग्राहकांचा प्रतिसाद २५ टक्के

तुषार महाले

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या (corona virus patients) घटल्यामुळे प्रशासनाकडून कोरोना निर्बंध शिथिल (lockdown restriction released) करण्यात आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह असला तरी ग्राहकांची संख्या आठवड्याभरापासून २५ टक्केच आहे. स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे. (Nashik-Unlock-25-percent-response-from-customers-since-last-week-marathi-news)

व्यापारी वर्गात उत्साह, स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागणार वेळ

गेल्या आठवड्यात सकाळी ७ ते दुपारी २ वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. सोमवारपासून (ता. ७) सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या लाटेत स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागला होता. गेल्या आठवड्यापासून ग्राहकांचा २५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा धोका वाढल्याने प्रशासनाने आधी विकेंड लॉकडाउन लावला होता. दुकाने बंद असले तरी वीजबिल पूर्ण आले आहे. त्यामुळे वीजबिलामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. काही व्यवसायाचा मोसम उन्हाळ्यात असल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा सुरळीत होईल, अशी आशा व्यापारी व्यक्त करत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव बघता नागरिकांनी सावध व्हावे. अनलॉक केले असले तरी नागरिकांनी अटी-शर्तीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

महिन्याचा खर्च अधिक असून दुकान बंद असूनही वीजबिलही पूर्ण आले आहे. व्यवसाय करणे मुश्कील झाले असून नुकसान होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव बघता नागरिकांनी निर्बंध पाळत व्यापाऱ्यांना सहकार्य करावे.

- राकेश शेवाळे, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT