Nashik Water Shortage : इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याची कोरडी छाया नागरीकांची तडफड वाढवत आहे. पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर येऊन ठेपली आहे. पाण्याअभावी पिकेही सुकू लागली आहे. तालुक्यातील लहानमोठ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Nashik Water Shortage Water level has decreased in Igatpuri taluka marathi news)
दारणा धरण २४.६५, मुकणे ३०.८३, वाकी ४३.५४, भाम २३.५३, भावली १३.११, कडवा २५.१० असा जलसाठा धरणात शिल्लक आहे. आतापासूनच धरणाच्या तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाईवर अद्याप नियोजन झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. पाणी बचतीसाठी कठोर धोरण अवलंबावे लागणार आहे.
तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपयोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तापमानामुळे मका पिकाचा पालापाचोळा झाला आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यावाचून होरपळत आहे. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहे. तर दिवसेंदिवस वाढलेल्या तापमानामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. (latest marathi news)
सूर्य आग ओकत असून, उन्हामुळे सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले असल्याचे दिसते. तालुक्यातील धरणांतील पाणी मराठवाड्याची पाण्याची गरज ओळखून मराठवाड्यात सोडण्यात आले. अकाली सोडलेले आवर्तन तालुक्याला अलाभदायी ठरलेले असून, शेतकऱ्यांसमोर चिंता आहे.
''सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असल्याने राजकीय नेते त्यात व्यस्त आहेत. कुणाला पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळच नाही. त्यात आदर्श आचारसंहिता चालू आहे. प्रशासनाने पाणी समस्यांकडे लक्ष द्यावे.''- दादाभाऊ शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.