Winter sakal
नाशिक

Nashik Winter Update: ढगाळ वातावरण, तरी गारठ्यात वाढ; आज तुरळक पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: अवकाळी पावसाने झोडपल्‍यानंतरही सध्या वातावरण ढगाळ राहते आहे. दिवसभरात काही वेळेसाठी पडणारे सूर्यकिरण नाशिककरांसाठी दिलासादायक ठरत आहेत. ढगाळ वातावरण राहात असले तरी गारठादेखील वाढतो आहे.

हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार शनिवारी (ता.२) तुरळक प्रमाणात पावसाची शक्‍यता आहे. यानंतर मात्र पारा घसरण्याचा अंदाज आहे. (Nashik Winter Update Chance of rain today news)

ढगाळ वातावरणामुळे नाशिकचा पारा सातत्‍याने वाढत होता. त्‍यामुळे यंदाच्‍या हिवाळ्यात अपेक्षित गारठा जाणवलेला नव्‍हता. परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्‍या अवकाळी पावसानंतर वातावरणात काही प्रमाणात गारठा जाणवू लागला आहे. शुक्रवारी (ता. १) नाशिकचे किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस राहिले.

तर कमाल तापमान २९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. येत्‍या काळात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खालावण्याचा अंदाज असल्‍याने वातावरणात गारठ्यातही वाढ होऊ शकते. तत्‍पूर्वी शनिवारी (ता.२) ढगाळ वातावरण राहून नाशिकमध्ये काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

सायंकाळच्‍या वेळी वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने, बचावासाठी नाशिककरांकडून स्‍वेटर, जॅकेटचा आधार घेतला जातो आहे. तसेच स्‍थानिक बाजारपेठांवरही परिणाम जाणवू लागला असून, नऊच्‍या सुमारास बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघायला मिळतो आहे.

नोव्‍हेंबरमध्ये ३२.९ मिलिमीटर पाऊस

अवकाळीने शहरासह ग्रामीण भागात अतोनात नुकसान केले होते. नोव्‍हेंबर महिन्‍यात एकूण ३२.९ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यापैकी २७ नोव्‍हेंबर या एका दिवसात तब्‍बल २९.१ मिलिमीटर पाऊस झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT