Nashik Winter Update: पाऊस थांबला, गारठा वाढला..! कमाल तापमानात 5 अंशांची घसरण

Winter Season
Winter Seasonesakal

Nashik Winter Update : अवकाळी पावसाने झोडपल्‍यानंतर सोमवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारनंतर पाऊस थांबला, मात्र गार वाऱ्यामुळे वातावरणातील गारठा वाढला होता.

कमाल तापमानात पाच अंशांची घसरण नोंदविली गेली आहे. येत्‍या काही दिवसांत किमान तापमान घसरून ११ ते १२ अंश सेल्सियसपर्यंत खालावण्याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. (Nashik Winter Update 5 degree drop in maximum temperature news)

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असल्‍याने पाऱ्यातही वाढ झाली होती; परंतु रविवारी (ता. २६) दुपारनंतर शहर परिसरात जोरदार पाऊस झाल्‍यावर पाऱ्यात घसरण झाली. सोमवारी सकाळच्‍या वेळी शहरातील काही भागांमध्ये तुरळक स्‍वरूपात पाऊस झाला. नंतर दिवसभर आकाश ढगांनी व्‍यापलेले होते.

वातावरणातील वाऱ्यामुळे सायंकाळपासून कमालीचा गारवा जाणवत होता. सोमवारी नाशिकचे किमान तापमान २२.९ अंश सेल्सियस नोंदविले गेले.

Winter Season
Nashik Winter Update: थंडीचा जोर, तापमानात घसरण

दरम्‍यान, रविवारी नाशिकचे कमाल तापमान २८ अंश सेल्सियस असताना त्‍यात पाच अंशांची घसरण होऊन सोमवारी नाशिकचे कमाल तापमान २२.९ अंश सेल्सियस नोंदविले गेले.

वातावरणातील गारव्‍याचा परिणाम जनजीवनावर पाहायला मिळाला. नाशिककरांनी जॅकेट, स्‍वेटरचा आधार घेत गारव्‍यापासून बचाव करण्याचा प्रयत्‍न केला.

ढगाळ वातावरण राहणार कायम

पुढील तीन दिवस शहरासह जिल्‍हाभरात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्‍यता आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याचीही शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे; तर १ डिसेंबरपासून आकाश मोकळे राहणार असल्‍याचा अंदाज आहे.

Winter Season
Nashik Winter Update: थंडीची चाहूल; उबदार कपड्यांना मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com