Women members of Women's Power Farms Producer Company, which manufactures various natural oils from lakdachi ghani.
Women members of Women's Power Farms Producer Company, which manufactures various natural oils from lakdachi ghani. esakal
नाशिक

Nashik Women Empowerment : घोटीवाडीत नैसर्गिक तेलनिर्मिती! अन्नपूर्णा बचत गटांच्या महिलांना मिळाले जगण्याचे बळ

विजय पगारे

इगतपुरी : माणसाची महत्वकांक्षा आणि आत्मविश्‍वास चांगला असला तर अतिशय सकारात्मक परिणाम साध्य होतात. व्यवसायाची जोड असली तर परिणाम अधिकच उत्तम दिसतात. याचाच प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील बचतगटांच्या महिलांना आला आहे. कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनेच्या माध्यमातून अन्नपूर्णाच्या महिलांना उद्योग व्यवसायात जीवन जगण्याचे बळ मिळाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडीजवळ दहा महिलांनी एकत्र येऊन वूमन्स पॉवर फार्मस प्रोड्युसर या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अन्नपूर्णा लाकडी घाण्याद्वारे विविध नैसर्गिक तेल बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे. (Nashik Natural oil production in ghotiwadi)

या उद्योगात शेंगदाणा तेल ३४० रुपये किलो, शुद्ध खोबरेल तेल ३४० रुपये किलो, मोहरी तेल ६० रुपये १०० मिली, तिळ तेल ५८० रुपये किलो अशा दराने विक्री होते. यामुळे रोजगाराला चालना मिळण्यास मोठी मदत झाली. कंपनीच्या अध्यक्षा मथुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे शेतकरी एकत्र आले.

त्यांनी तालुक्यात १०० बचतगटांची स्थापना करून महिलांना स्त्रीस्वंयम रोजगारासाठी प्रवृत्त केले. हिरवा मसाला, भाजणीचे थालीपीठ, हातसडीचा तांदूळ, सेंद्रिय गूळ आदींची विक्री केली. कंपनीत २६५ महिला सदस्य आहेत. अन्नपूर्णा महिला बचतगट २००६ मध्ये कार्यरत होता.

त्याच महिलांनी एकत्र येऊन कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनेच्या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पामार्फत १ कोटी ११ लाख ८६ हजार मंजूर असून, ४३ लाख २५ हजार अनुदान त्यांना मिळाले व स्वतःच्या पायावर महिला भक्कम उभ्या राहिल्या आहेत. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी इगतपुरी कृषी विभागाने मदत केली. (latest marathi news)

या कंपनीत दहा तेल घाणे असून, विविध प्रकारचे तेल बनवतात. अध्यक्षा मथुरा जाधव याअगोदर बचत गटातून सेंद्रिय गूळ, हातसडीचा तांदूळ विक्री करीत होत्या. त्यांच्या मनात कल्पना येताच त्यांनी हा उद्योग व्यवसाय सुरू केला. कंपनीत विमल डुकरे, सीमा कर्डक, सुमन घोडे, दीपाली सरोदे, सावित्रीबाई म्हसने, अनिता परदेशी, सुलोचना भुसेकर, साधना भगत, संगीता बिन्नर आदी महिला संचालक आहेत.

"घरची परिस्थिती हलाखीची होती. पैसा जगात सर्व काही असल्याचा प्रत्यय मुलगा आजारी पडल्यानंतर आला. कर्जबाजारी झाले होते. मात्र, झालेले कर्ज फेडले. माझे पाचवीपर्यंत शिक्षण झाले असून, मुलांना शिकवले. इतर महिलांनी हताश न होता मेहनत केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळेल." - मथुरा जाधव, अध्यक्षा, वूमन्स पॉवर फार्मस प्रोड्युसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT