Workers removing encroachment by JCB machine. esakal
नाशिक

Nashik : अर्चित बिल्डरचे अतिक्रमित बांधकाम तोडण्यास सुरवात

विक्रांत मते

नाशिक : गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून आरसीसी बांधकाम करणाऱ्या अर्चित बिल्डर्स व डेव्हलपर्सने स्वतःहून वादग्रस्त बांधकाम काढून घेण्यास शुक्रवार (ता.११) पासून सुरवात केली. अतिक्रमण काढण्यास सुरवात झाल्याने महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्याने कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (NMC starts demolishing encroached construction of Archit builders Nashik Latest Marathi News)

आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६७ हा महापालिकेच्या मालकीचा १८ गुंठे क्षेत्राचा भूखंड आहे. सातबारा उताऱ्यावरदेखील महापालिकेचे नाव लागले आहे. महापालिकेच्या भूखंडाला लागूनच सर्व्हे क्रमांक ६१ ब आहे. ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेला हा भूखंड रोड वाइंडिंगमध्ये गेला आहे. मात्र, असे असतानादेखील सर्व्हे क्रमांक ‘६१ ब’ वर इमारत उभी राहत असल्याचे दर्शविण्यात आले.

परंतु, प्रत्यक्षात सदर व्यावसायिक इमारत महापालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात माजी नगरसेवक अनिल चौघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नगर रचना विभागाने अर्चित बिल्डर्सला नोटीस पाठवून चौकशी केली.

‘नगररचना’ कडून स्वतंत्र कारवाई

चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर संबंधित बिल्डर्सला दुसरी नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही बिल्डर्सकडून अतिक्रमण काढले जात नसल्याने महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाकडून संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या कारवाईच्या भीतीने बिल्डर्सने शुक्रवारपासून स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. स्वतःहून अतिक्रमण काढले जात असल्याने महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT