Online roulette Crime
Online roulette Crime esakal
नाशिक

Nashik Crime: शहरात पुन्हा ‘ऑनलाइन रोलेट’ पसरतोय पाय; सिडकोतून एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऑनलाइन रोलेट जुगाराच्या नादाला लागून आत्तापर्यंत अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, अनेकांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याही केल्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या वर्षभरात ऑनलाइन जुगारावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आलेले असताना, शहरात पुन्हा ऑनलाइन रोलेट जुगाराने आपले पाय पसरविण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. सिडकोतून पोलिसांनी ऑनलाइन रोलेट जुगाऱ्याला अटक करीत गुन्हा दाखल केला आहे. (Online roulette spreading again in city One arrested from CIDCO Nashik Crime)

मनोज लुबानसिंग मांडवडे (३१, रा. शिवशक्ती चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रोलेट जुगाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ९) अंबड पोलिसांना ऑनलाइन रोलेट जुगाराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार, अंबड पोलिसांनी सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात संशयिताचा शोध सुरू केला असता, संशयित मनोज मांडवडे हा दुर्गानगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन रोलेट जुगार खेळत आणि ऑनलाइन इतरांना खेळवत असताना आढळून आला.

त्याने त्याच्या मोबाईलमध्ये बेकायदेशीररीत्या ऑनलाइन रोलेट खेळण्यासाठी वापरला जाणारे फनगेम या नावाचे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे तो विशिष्ट आयडी व पासवर्ड देऊन ऑनलाइन रोलेट हा जुगार खेळवत होता.

त्याच्याकडून पोलिसांनी रोलेट खेळण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोलेटचा विळखा; अधिवेशनात चर्चा

गेल्या काही वर्षांपासून शहरात ऑनलाइन रोलेट जुगार लपूनछपून खेळला जातो. विशेषत: पंचवटी, नाशिक रोड, गंगापूर रोड या परिसरात ऑनलाइन रोलेटचे जाळे अस्तित्वात असून, ते आता कामगार वसाहत असलेल्या सिडको, सातपूरकडे पसरू लागले आहे.

रोलेटच्या विळख्यात मोठ्या संख्येने तरुणाई अडकली असून, कर्जबाजारीपायी उद्ध्वस्त झाली तर काहींनी आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी नाशिकसह जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. परंतु मधल्या काळात पोलिसांनी कठोर कारवाई केल्याने ऑनलाइन रोलेटच्या ‘दुकानदारी’ वर अंकुश आला होता.

परंतु सिडकोतून ऑनलाइन रोलेट प्रकरणी एकाला अटक केल्याने शहरात पुन्हा रोलेट पाय पसरतोय का, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

दुसरीकडे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन रोलेट जुगाऱ्यांवर बंदी व त्याविरोधात कारवाईबाबत विशिष्ट उपाययोजना करण्याचे संकेत दिलेले आहेत.

"ऑनलाइन खेळला जाणारा जुगार वा रोलेट यासारख्या जुगाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सायबर पोलिसांकडून सातत्याने ‘वॉच’ ठेवला जातो. तसेच, त्याआधारे कारवाईही केली जाते. तरुणांनी या विळख्यात अडकू नये. त्याचप्रमाणे, अशाप्रकारे जुगार सुरू असल्याने पोलिसांशी संपर्क साधावा."- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT