along with the team performing orbital atherectomy technique at Magnum Heart Institute Dr. Manoj Chopra. esakal
नाशिक

Nashik News : ऑर्बिटल एथेरेक्टॉमी तंत्रज्ञानाने टाळली बायपास शस्त्रक्रिया; मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटला यश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ऑर्बिटल एथेरेक्टॉमी तंत्रज्ञानाने उत्तर महाराष्ट्रात मुंबई नंतर नाशिकमध्ये पहिली ऑर्बिटल एथेरेक्टॉमी तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉ. मनोज चोपडा यांच्या टीमला यश आले.

या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाची दुसऱ्यांदा बायपास सर्जरी टाळून हृदयरोगावरती यशस्वी उपचार करण्यात आले. या उपलब्धीने नाशिकचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उंचावले आहे. (Orbital atherectomy technique avoided bypass surgery Magnum Heart Institute success Nashik News)

मुंबई येथील ५९ वर्षीय रुग्णाला हृदयविकारानंतर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाची अगोदर बायपास झालेली होती. पुन्हा कॅल्शिअम जमा झाल्यामुळे रुग्णाला कोरोनरी इशेमियाचा त्रास झाला.

रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या अनफिट असल्यामुळे बायपास करणे शक्य नव्हते. तसेच रुग्णामध्ये जास्त कॅल्शिअम युक्त अडथळा असल्याने बलून व स्टेण्ट टाकणे अवघड होते. त्यामुळे रुग्णाला अत्याधुनिक अशा डायमंडबॅक ३६० ऑर्बिटल एथेरेक्टॉमी प्रणालीच्या साहाय्याने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय मॅग्नम हॉस्पिटलचे डॉ. मनोज चोपडा यांनी घेतला.

ऑर्बिटल एथेरेक्टॉमी प्रणाली ही हाताळताना अतिशय उच्च दर्जाचे कौशल्य आणि अचूकतेची गरज असते. डॉ. चोपडा व त्यांच्या टीम ने ८० हजार केपीए चा दाब देऊन रुग्णाच्या धमनीतील कॅल्शिअमचा निचरा केला व नंतर कोरोनरी स्टेंटिंग करण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट मधील डॉ. चोपडा व त्यांच्या टीमने या गंभीर प्रक्रियेला ९० मिनिटांमध्ये पूर्ण केले. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

“पेशंटच्या डाव्या बाजूची मुख्य नलिका व डाव्या बाजूच्या दोन्ही नसांमध्ये ब्लॉकेज असल्यामुळे गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी करणे आवश्यक होते. ऑर्बिटल एथेरेक्टॉमी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कॅल्शिअम ब्रेक करून स्टेण्ट टाकले. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच बायपास सर्जरीचा सल्ला दिलेल्या रुग्णाला अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी उपचार करण्यात आले.”

- डॉ. मनोज चोपडा, वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट आणि संचालक मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

SCROLL FOR NEXT