pawar brothers
pawar brothers esakal
नाशिक

Nashik News : विहिरीसाठी पवार बंधूंनी स्वमालकीची जागा केली दान

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : काकडगाव (ता. बागलाण) येथील गावाला पाण्याची (Water) चणचण भासू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच तत्पर असते. (Pawar brothers donated their own land for well nashik news)

गावाला काही देणं लागते याच उदात्त हेतूने येथील प्रगतशील शेतकरी सुरेश महेंद्र पवार व सरपंच संजय पवार यांनी मालकीच्या जागेतून दोन गुंठे जागा विहीर खोदण्यासाठी दान करून दिली. ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे कौतुक करीत गावासाठी देवदूत धावून आल्याची भावना व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश गावात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते मात्र काकडगाव (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत असते. गावाला शुध्द पाणीपुवठा तसेच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासू नये याची जाणीव लक्षात घेऊन शेतकरी सुरेश पवार व सरपंच संजय पवार दोघे भावंड यांनी गावाला विहीर खोदाईसाठी दोन गुंठे जमीन दान करून दिली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

गावाला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, केंद्र सरकारव्दारा पुरस्कृत जनजीवन मिशन योजनेअंतर्गत गावाला नळ पाणीपुरवठा योजना करणेसाठी साठ लाख रुपये मजूर असून सुरेश पवार यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायतीला नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जमीन दान केल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी सरपंच संजय पवार, उपसरपंच विमल पवार, सदस्य राजेंद्र सोनवणे, प्रदिप अहिरे, आशाबाई सोनवणे, ग्रामसेवक डी.एस.कापडणीस, पोलिस पाटील वासंती पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत पवार, ग्रामस्थ विठ्ठल पवार, अशोक पवार, वसंत पवार, केदा पवार, राजेंद्र पवार, पुष्कर पवार, ज्ञानदेव पवार, भाऊसाहेब पवार, कारभारी पवार, प्रवीण पवार, निंबा सोनवणे, भाऊसाहेब काकडे, जयवंत वाघ, युवराज अहिरे, हर्षद अहिरे, गोरख अहिरे, संदीप भामरे, लखन सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT