murder
murder esakal
नाशिक

Nashik Crime : पिंपळकोठेतील तरुणाचा आलियाबादमध्ये खून; भोंदूबाबाने खून केल्याचा नातेवाइकांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या आलियाबाद (ता. बागलाण) येथे पिंपळकोठे (ता.बागलाण) येथील एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा खून आलियाबाद येथील भोंदू बाबाने अघोरी विद्येचा प्रकार करून केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रवीण गुलचंद सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत जायखेडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. या घटनेमुळे परिसरासह बागलाण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तुळशीराम बुधा सोनवणे असे संशयित बाबाचे नाव आहे. संशयित बाबा हा घटनेपासून पसार झाला आहे. (Pimpalkothe ​​youth murdered in Aliabad Relatives allege that Bhondubaba killed Nashik Crime news)

पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे याची तब्येत बरी नसल्यामुळे तो आलियाबाद येथील हा एका बाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता.या बाबाचे देखील प्रवीण सोनवणे यांच्या घरी येणे जाणे होते.

आठवड्यापूर्वी प्रवीण हा आलियाबाद येथे उपचारासाठी गेला होता. पण आठ दिवस उलटून देखील प्रवीण घरी न आल्याने नातेवाइकांनी बाबाशी संपर्क साधला असता संशयित बाबा हा प्रवीणच्या बाबतीत नातेवाइकांना उडवाउडवीचे उत्तरे देत.

या बाबाचे आदिवासी वस्तीत एकांतात घर असल्याने आणि आजूबाजूचे लोकही बाहेरगावी कामाला गेल्याने बाबाच्या घराजवळ कोणी येत नसे. गावातील भिमाबाई सोनवणे व मोतीराम सोनवणे यांना भोंदूबाबा सोनवणे यांच्या घराजवळ निळ्या रंगाच्या माशा अधिक प्रमाणात दिसल्याने व घरात काहीतरी अघटित घडल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिस पाटील शिवाजी जगताप यांना खबर दिली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

श्री. जगताप यांनी जायखेडा पोलिस स्टेशन संपर्क साधून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट, सहाय्यक अधिकारी संजय वाघमारे यांनी घटनास्थळी पोचत घराची तपासणी केली असता त्यांना प्रवीण सोनवणे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईची मागणी

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा

द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा उपसरपंच नितीन भामरे, गुलचंद सोनवणे, ताराबाई सोनवणे, सुरेखा सोनवणे यांनी केली आहे. सदर घटनेमुळे बागलाणसह गुजरात सीमेवरील परिसरातील अशा भोंदूबाबांचे धागे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT