PM Kisan Yojana E-KYC issue find bogus farmers nanded
PM Kisan Yojana E-KYC issue find bogus farmers nanded esakal
नाशिक

PM Kisan Yojana | करदात्या लाभार्थ्यांना वीस कोटींचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत सदोष याद्यांमुळे सुमारे ७२ हजाराहून अधीक लाभार्थी संज्ञेत न बसणाऱ्या करदात्यांना सुमारे वीस कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हा यंत्रणेकडून पून्हा संबधितांकडील पैसे वसूल करण्याची मोहीम गतीमान झाली आहे. आतापर्यंत ९ हजार ७८३ अपात्र शेतकऱ्यांनी ६ कोटी ९९ लाख ३४ हजार रूपये परत केले आहे.

जिल्ह्यात पीएम किसान योजनेअंतर्गत ४ लाख ९३ हजार १७२ शेतकऱ्याची नोंद असून, प्रशासनाने २ हजार ५४० प्रकरणे नाकारली, तर तांत्रिक कारणास्तव २ हजार २८ लाभार्थ्यांना लाभ देणेही थांबविले आहे. उत्तर महाराष्ट्रात १९ लाख खातेदार शेतकरी आहेत. केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजारापर्यंत मदत देण्यात आली.

मात्र, योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या अनेक अटी-शर्ती आहेत. प्रामुख्याने प्राप्तीकर भरणारे, सरकारी नोकरी असलेले, लोकप्रतिनिधी अशा लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही एकट्या नाशिक जिल्ह्यात ७२ हजाराहून अधीक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या अटी-शर्तीनुसार संबधितांच्या खात्यावर सरकारी पैसे जमा व्हायला नको होते, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमा परत घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे.

याद्या सदोष

पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या करताना संकलित केलेल्या याद्या आणि त्यातील माहीती सदोष असल्याचे निष्पण होते आहे. विशेषत: एकाच खातेदाराचे आधार कार्डावरील नाव आणि बॅक खात्यातील नावाच्या स्‍पेलींगमध्ये तफावत आहे. काहींचे मोबाईल क्रमांक जुने अन्‌ कधीच बंद झालेले आहेत. असे ३२ हजार २३० शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. मात्र, त्यापूर्वीच अनेकांच्या नावावर अंदाजे १७ कोटी ९३ लाख ७४ हजाराची रक्कम वाटप झाली. दरम्यान, प्रशासनाने अपात्र ठरलेल्या ९ हजार ७८३ बँक खात्यात जमा झालेली ६ कोटी ९९ लाख ३४ हजाराची रक्कम परत जमा करुन घेतली आहे. तलाठ्यापासून तर वरिष्ठ आधिकाऱ्यांपर्यत सगळ्यांच्या बैठका आणि प्रशिक्षण घेऊन गावोगाव शिबीर घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संबधित तीस हजारावर सदोष नावांच्या याद्या बिनचूक करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT