Police combing
Police combing esakal
नाशिक

Cidco Shootout Case : गोळीबारीनंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग

सकाळ वृत्तसेवा

Cidco Shootout Case : गेल्या रविवारी (ता. १६) सिडकोतील बाजीप्रभु चौकात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर शहर पोलिसांनी सोमवारी (ता. १७) रात्रभर शहरभर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत पोलिसांनी १४५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत चौकशी केली, तर हत्यार बाळगणाऱ्या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. (Police combing in city after Cidco Shootout Case nashik crime news)

मात्र, गंभीर स्वरुपाची घटना घडल्यानंतरच शहर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याऐवजी वारंवार गुन्हेगारांविरोधात कोम्बिंग राबविण्याची आवश्‍यकता व्यक्त होते.

वास्तविक, शहरात एकीकडे वारंवार गोळीबारीच्या घटना घडतात तर, दुसरीकडे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या हाती कट्टे लागत नाहीत. त्यामुळे कोम्बिंगची ‘खबर’ गुन्हेगारांना आगाऊच मिळते का, असा प्रश्‍नही उपस्थित होतो आहे.

गेल्या महिन्यात सातपूरमधील कॉर्बन नाका परिसरात गोळीबार झाला होता. त्यावेळीही शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यानंतर गेल्या रविवारी (ता. १६) भरदिवसा सिडकोत सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

यात कोष्टी जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याच पाश्‍र्वभूमीवर शहर पोलिसांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये सोमवारी (ता. १७) रात्रीपासून मंगळवारी (ता. १८) पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

पोलिस निरीक्षकांनी बीट अंमलदारांकडून याद्या तयार करुन घेतल्या आहेत. गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनेनुसार सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.

पोलिस आयुक्तांसह तीन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, १५ प्रभारी पोलिस निरीक्षक, २९ सहायक निरीक्षकांसह २७० अंमलदारांसह गुन्हे शाखा युनिट एक व दोनची पथके, तसेच गुन्हे शाखेकडील सर्व पथकांतील कर्मचारी व अधिकारी ‘कोम्बिंग ऑपरेशन’वेळी रात्रभर कार्यरत होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

यात सराईत गुन्हेगार, तडीपार, वाँटेड, वॉरंटमधील संशयितांसह हिस्ट्रिशीटर तपासून ताब्यात घेण्यात आले. १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १९ ठिकाणी पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने संशयितांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले.

मात्र, या कोम्बिंगमध्ये अजामीनपात्रांसह अवघे कमी गुन्हेगार हात लागले. त्यामुळे शहर पोलिसांनी कोम्बिंगची कारवाईच फोल ठरल्याची चर्चा पोलिस वर्तुळातच रंगली.

* कोम्बिंग कारवाई

सराईत तपासणी : २१७

सापडलेले गुन्हेगार : १४५

हद्दपार सापडले : २

हत्यारधारी : ४

याठिकाणी झाली कोम्बिंग

परिमंडळ एक : फुलेनगर (पंचवटी), निलगिरी बाग (नांदूरनाका), अश्वमेध नगर (बोरगड), भिमवाडी (पंचशिलनगर), बजरंगवाडी, नागसेननगर, मल्हार खाण (रविवार पेठ), संत कबीरनगर, शिवाजीनगर.

परिमंडळ दोन : अंबड, प्रबुध्‌दनगर, संतोषीमाता नगर, श्रमिकनगर, म्हाडा वसाहत, राजीवनगर, पाथर्डीगाव, सिन्नर फाटा, जेलरोड, रेल्वेस्टेशन परिसर, सुंदरनगर, गांधीनगर, नारायण बापूनगर, कॅथे कॉलनी, भगूर, संसरी गाव, देवळाली कॅम्प.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT