crime news
crime news esakal
नाशिक

Nashik Crime : शहरात अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहर पोलीस आयुक्तालय हददीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार, पोलिसांची ठिकठिकाणी अवैधरित्या सुरू असलेले दारुअड्डे, जुगार-मटक्या अड्ड्यावर धाडी टाकून कारवाई केली आहे.

याप्रकरणी मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणेनिहाय पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Police raids on illegal liquor gambling dens in city Nashik Crime)

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाजता नानावली परिसरात गुरुवारी (ता. ८) रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करीत पाच जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून १५०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.

पाचही जुगारी जुने नाशिक परिसरातील रहिवासी असून त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड पोलिसांनी शनिवारी (ता.९) दुपारी दीडच्या सुमारास मिना बाजार बसस्थानकाजवळ छापा टाकून दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ९०० रुपयांची रोकड जप्त केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातपूर पोलिसांनी प्रबुद्धनगर परिसरात कारवाई करीत अमोल अंकुश खाडे (३५) याच्याकडून ३ हजार ९०० रुपयांचा अवैधरितया देशी मद्यसाठा जप्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा रोडवर कारवाई करीत दादा कौतिक जोंधळे (४२) याच्याकडून ९८० रुपयांचा अवैधरित्या देशी मद्यसाठा जप्त केला.

तर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई करीत विकास विलास गवई (२७, रा. मराठानगर, नाशिकरोड) याच्याकडून २ हजार ४८५ अवैधरित्या रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला आहे. या दोन्ही संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT