Printing of Nepal currency notes at Nashik Press 430 million notes of one thousand
Printing of Nepal currency notes at Nashik Press 430 million notes of one thousand sakal
नाशिक

Nepal Currency Note : नेपाळच्या नोटांची छपाई आता नाशिक प्रेसमध्ये

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयाला नेपाळच्या एक हजाराच्या ४३० दशलक्ष नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. छपाईचे कंत्राट मिळवण्यासाठी चीन स्पर्धेत असतानाही भारतातील प्रेसने काम मिळवले हे विशेष.

यापूर्वी ५० रुपयाच्या ३०० दशलक्ष नोटा छापण्याचे वेगळे कंत्राटही मिळाले आहे. त्यामुळे एकूण ७३० दशलक्ष नोटा छापण्याचा करार नेपाळबरोबर नुकताच झाल्याची मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी सांगितले.

नेपाळच्या नोटांबरोबरच भारताच्या एकूण ५३०० दशलक्ष नोटा छापण्याचे मोठे कामही प्रेसला मिळाल्याने या सर्व नोटा एक वर्षात छापून द्यायच्या असून कामगार त्यासाठी सज्ज झाले आहेत. चीनसारख्या देशाला नोटांचे कंत्राट मिळण्याच्या स्पर्धेत मागे टाकून नेपाळचे एक हजार रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट नाशिक प्रेसने मिळवले आहे हे विशेष. नेपाळच्या पन्नासच्या नोटा छपाईचे कामही चीन व फ्रान्सला मागे टाकून नाशिक रोड प्रेसने मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT