murder
murder esakal
नाशिक

Nashik Crime News: फिर्यादीच अडकला खुनाच्या गुन्ह्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणाने मेहुण्याने शालकाच्या डोक्यात लोखंडी हतोडीने घाव घालत ठार मारल्याची घटना गेल्या १६ मेस रात्री नांदगाव शहरातील आनंदनगर भागात घडली होती.

या गुन्ह्यातील फिर्यादीच आरोपी निघाला असुन, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (prosecutor involved in crime of murder Nashik Crime News)

आनंद नगर भागात मागील आठवड्यात वाल्मीक साहेबराव ठाकूर याचा खुन झाल्याची घटना घडली होती. मृत वाल्मीक ठाकूर हा सुरत येथे खासगी नोकरीला होते. काही दिवसांपूर्वी तो आपल्या स्वतःच्या घरी नांदगावी आला असताना दारुच्या नशेत आई-वडिलांना मारहाण केली होती.

त्यामुळे त्याचे मेहुणे ईश्‍वर देवराम ठाकूर व चुलत भाऊ प्रदीप निवृत्ती ठाकूर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाल्मिकची दोघांशी बाचाबाची झाली होती. वाल्मीकला ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ईश्‍वर ठाकूर यांनी वाल्मिक यांस ठार मारल्याची फिर्याद प्रदीप ठाकूर याने नांदगाव पोलिसांत दिली होती. पोलीसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना ईश्‍वर ठाकूरची चौकशी केली असता, त्याने प्रदीप हा देखील या गुन्ह्यत सहभागी असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावरून पोलीसांनी प्रदीपला अटक करून पोलीसी खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबूली दिली. मंगळवारी (ता. २३) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाढे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर, पोलीस उपनिरीक्षक ईश्‍वर पाटील, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, सागर कुमावत, भारत कांदळकर, नंदकिशोर पिंपळे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT