rajendra.jpg
rajendra.jpg 
नाशिक

नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र वानखेडे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी शहरातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र किसन वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत 10 सदस्य वैयक्तिक अंतर ठेऊन प्रत्यक्ष तर दहाहून अधिक सदस्य ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले होते.

सिव्हील इंजिनियर असलेले राजेंद्र वानखेडे यांनी १९८३ पासून ते १९९९ पर्यंत शासकीय सेवेत पाटबंधारे विभागात अभियंता या पदावर काम केले असून त्यानंतर शासकीय सेवेचा राजीनामा देऊन बांधकाम व्यावसायीक म्हणून सुरूवात केली. राजेंद्र वानखेडे पंढरपूर वारीत सात वेळा प्रत्यक्ष व नियोजनात सहभागी झाले असून दरवर्षी 2 ऑक्टोबरला होणाऱ्या नाशिक ते मुंबई एकता रॅलीची धुरा गेल्या चार वर्षांपासून वानखेडे यांच्याकडे आहे.

रत्नाकर आहेर यांच्याकडून पदभार स्वीकारणारे वानखेडे नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनचे पाचवे अध्यक्ष असतील. विशाल उगले, दिवंगत जसपालसिंग विर्दी, प्रवीण खाबिया यांनी फाउंडेशनतर्फे अनेकाविध उपक्रम राबवून नाशिकला सायकल कॅपिटल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

सामान्य नाशिककर हा सायकलवर फिरला पाहिजे इंधन मुक्त प्रवास झाला पाहिजे सायकल चालवून आरोग्य चांगले राहिले पाहिजे व नवीन सायकलिस्टला व्यासपीठ मिळाले पाहिजे यासाठी आपण वर्षभर वैविद्यपूर्ण उपक्रम राबवणार असून नाशिक शहर हे  सायकलचा असलेला ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी आपण कामकाज करणार आहोत -  राजेंद्र वानखेडे 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT