नाशिक

Raosaheb Danve News: मोदी सरकार म्हणजे खरे गरिबांचे सरकार : रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा

Raosaheb Danve News : नागरिकांना विविध सेवा-सुविधा मोफत देणारे केंद्रातील मोदी सरकार म्हणजे खरे गरिबांचे सरकार असल्याचे मत रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी (ता. २३) येथे व्यक्त केले.

तालुक्यातील जुनी बेज येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे हिरवी झेंडी दाखवून गुरुवारी उद्‍घाटन झाले. त्या वेळी श्री. दानवे बोलत होते. (Raosaheb Danve statement about Modi government nashik news)

व्यासपीठावर नाशिक जिल्हा उत्तर अध्यक्ष सुनील बच्छाव, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, उपजिल्हाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार, कोशाध्यक्ष गोविंद कोठावदे, शहराध्यक्ष निंबा पगार, शिक्षक आघाडीचे जिल्हाप्रमुख एस. के. पगार व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. दानवे म्हणाले, की भारत हा गरिबांचा देश आहे. भारतात ८० कोटी लोक गरीब आहेत. त्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. राजीव गांधी यांच्या काळात केंद्रातून १०० रुपये पाठविले असता लाभार्थ्याला प्रत्यक्षात १५ रुपये मिळायचे, मात्र मोदी सरकारच्या काळात योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा होत आहे.

गरीब नागरिकांना केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार काम करीत आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकार कोणकोणत्या योजना राबवत आहेत, त्याची माहिती दिली जाते. या योजनांचा तळागाळातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष हितेंद्र पगार, हेमंत रावले, चेतन निकुंभ, काशीनाथ गुंजाळ, मोती वाघ, प्रभाकर निकम, दिनकर आहेर, विशाल गुंजाळ, अशोक बोरसे, गौरव पाटील, भिका वाघ, योगेश आहेर, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, जुनी बेजचे सरपंच सुनील पवार, उपसरपंच संगीता बच्छाव, विजय खैरनार, भूषण बच्छाव, संजय बच्छाव, विनोद खैरनार, बाजीराव धनवटे, बळवंत बच्छाव, नवी बेजचे उपसरपंच मधुकर वाघ, नितीन पवार, प्रफुल्ल बच्छाव आदी उपस्थित होते.

दानवेंच्या सूचक इशाऱ्याची चर्चा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबत अनेक वृत्तपत्रांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असताना गुरुवारी (ता. २३) जुनी बेज येथे जाहीर सभेत महिलांची उपस्थिती पाहून भारावून गेलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाषणादरम्यान म्हणाले, की आपल्या मतदारसंघात उपस्थित महिलांमधून खासदार, आमदार होऊ शकतात. त्यांच्या या सूचक इशाऱ्यामुळे खरंच भाजप भाकरी फिरविणार का, याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT