NMC
NMC esakal
नाशिक

महापालिका पूर्व विभागीय कार्यालयाची मार्चअखेर विक्रमी वसुली

- युनूस शेख

जुने नाशिक : मार्चअखेर पूर्व विभागीय कार्यालयाने विक्रमी थकबाकी वसुली केली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध कर कक्षात मोडणारी थकबाकीपोटी सुमारे ४० कोटींची वसुली केली आहे. दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे थकबाकी वसुली होऊ शकली नव्हती.

मार्चअखेर महापालिका आयुक्तांकडून विभागीय अधिकाऱ्यांना थकबाकी वसुली करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्वच विभागांकडून महिनाभरापासून घरपट्टी पाणीपट्टी विविध कर विभागात मोडणाऱ्या थकबाकी वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पूर्व विभागीय कार्यालयाकडून त्याअनुषंगाने विक्रमी वसुली केली आहे. ३१ मार्चपर्यंत सुमारे ३९ कोटी ६२ लाख ११ हजार ६६६ इतकी वसुली झाली. त्यात केवळ ३१ मार्च या एका दिवसात विभागीय अधिकारी स्वप्नील मुधळवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या पथकाने एक कोटी ७६ लाख ४३ हजार ९८८ इतकी विक्रमी थकबाकी वसुली केली. दोन वर्षाच्या कोरोना काळातील थकबाकीसह यंदाची अशा तीन वर्षांच्या थकबाकीपोटी कोटीचे देण्यात आलेल्या लक्षपैकी सुमारे पन्नास टक्के लक्ष एका वर्षात पूर्व विभागीय कार्यालयाकडून पार करण्यात आले. अद्यापही बहुतांश शासकीय तसेच राजकीय कार्यालयांकडे प्रस्तावित असलेली कोटीची थकबाकी येणे बाकी आहे. ती थकबाकी वसुली झाली असती तर १०० टक्के लक्ष्य पूर्ण झाले असते.

असे असले तरी कोरोना प्रादुर्भावानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली वसुली महापालिका तिजोरीत भर घालणारी आहे. वसुलीत महापालिकेच्या अभय योजनेचाही सहभाग राहिला आहे. योजनेच्या माध्यमातून थकबाकीदारांना दिलेल्या सूटमुळे अनेक थकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणात बिलाची रक्कम भरल्याने वसुलीत वाढ होण्यास मदत झाली आहे.

वसुलीचे स्वरूप - वसुली रक्कम

घरपट्टी २७ कोटी २१ लाख १९ हजार ९३६

पाणीपट्टी १० कोटी ४० लाख ९१ हजार ७३०

विविध कर ०२ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT