onion
onion Google
नाशिक

येवल्यात कांदा विक्रीसाठी आजच करावी लागणार नोंदणी

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता. २४) पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना अगोदरच दूरध्वनीद्वारे ट्रॅक्टरची नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय कोरोना चाचणीही करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Registration for onion sale in Yeola will have to be done today)

मुख्य आवारात ५०० कांदा ट्रॅक्टर व उपबाजार अंदरसूल येथे ३०० कांदा ट्रॅक्टर (फक्त ट्रॅक्टर) लिलावासाठीची नोंदणी आज (ता. २३) सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत करण्यात येणार आहे. येवला मुख्य आवारासाठी मोबाईल क्रमांक ९४२१५६३७६७, ९४२३१८३४५९ व ९९७०११३४०९ तसेच, उपबाजार अंदरसूलसाठी ९४२३४७८११३, ९४२३४७८१४१ व ९८८१९१५२१७ या क्रमांकावर नोंदणीची सुविधा करण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर मोबाईल बंद करण्यात येतील. ३१ मेपर्यंत फक्त ट्रॅक्टरमधील कांदा वाहनांचाच लिलाव होईल. नोंदणी केलेल्या शेतक-यांनाच सोमवारी (ता. २४) सकाळी ६ ते ९.३० पर्यंत नोंदणी केलेल्या नंबरची खात्री करुन एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार आहे, असे मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव के. आर. व्यापारे व सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने केले आहे.

(Registration for onion sale in Yeola will have to be done today)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT