crematorium
crematorium esakal
नाशिक

SAKAL Exclusive : अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वेटिंगवर! नाशिक, पंचवटी अमरधाममध्ये बेड वाढविणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाकाळात मृतांची संख्या वाढल्याने बेड अपुरे पडून जमिनीवर अग्निसंस्कार करण्याची वेळ आली. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतरदेखील अमरधाममध्ये बेडची संख्या अपुरी पडत आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत अंत्यसंस्कारासाठी दहा ते बारा तास वेटींगवर मृतांच्या कुटुंबीयांना राहावे लागले. त्यामुळे नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये प्रत्येकी पाच बेड वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर पंचवटी, सिडको व नाशिकरोड मध्ये प्रत्येकी दोन विद्युतदाहिनी तयार केली जाणार आहे. (SAKAL Exclusive Dead bodies waiting for cremation Nashik Panchavati will increase beds in Amardham nashik NMC News)

नाशिक शहराचा विस्तार होत असताना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विद्युत, आरोग्य व वैद्यकीय सेवा याकडे अधिक लक्ष दिले जाते.

परंतु मागील वर्षाच्या दहा महिन्यात हिंदू स्मशानभूमीतील बेडची संख्या वाढविण्याची गरज असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली. २०२१ ते मार्च २०२२ या वर्षात कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक होती.

हिंदू स्मशानभूमीत अग्नीदहन, विद्युत व गॅसदाहिनी मिळून तब्बल १३ हजार ७६४ मृतदेहांची नोंद झाली. त्यानंतर कोरोना परिस्थिती पूर्वपदावर आली. परंतु कोरोनापूर्वीच्या कालावधीतील सरासरीत मृत्युंमध्ये वाढ झाली.

त्याचा परिणाम अंत्यसंस्कारासाठी बेड कमी पडण्यावर झाला. त्यामुळे महापालिकेने पंचवटी व नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

२६ स्मशानभूमीत ९२ बेड

नाशिक महापालिका क्षेत्रात सिडको, पंचवटी, पूर्व, नाशिक रोड व सातपूर पाच विभागांमध्ये एकूण २६ हिंदू स्मशानभुमी (अमरधाम) असून त्यात एकूण ९२ बेड आहेत.

यातील सिडको विभागात मोरवाडी (४), उंटवाडी (२), पाथर्डी (२), कामठवाडे (२), अंबड (२), दाढेगाव (२) असे एकूण चौदा बेड आहेत. पंचवटी विभागात गणेशवाडी (९), नांदूर २), मानूर (२), आडगाव (४), म्हसरुळ (३), मखमलबाद (४) असे एकूण २४ बेड. पूर्व विभागात टाळकुटेश्वर अमरधाम (१४), आगर टाकळी (२) असे एकूण १६ बेड असून, नाशिक रोड विभागात देवळालीगाव (६), विहीतगाव (३), चेहेडी (२), वडनेर दु. (२), पिंपळगाव (२), चाडेगाव (२), दसक व पंचक (९) असे एकूण २६ बेड, सातपूर विभागात स्वारबाबानगर (५), पिंपळगाव बहुला (२), गंगापूर गाव (३), आनंदवल्ली (२) असे एकूण १२ बेड आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मागील दहा महिन्यातील अग्निदहन स्थिती

विभाग अग्निदहन

पूर्व १४३२

नाशिक रोड ९८६

सिडको १२७६

सातपूर ६०४

पंचवटी ८६१

---------------------------------

एकूण ५१६९

विद्युत दाहिनी- ८३२

गॅस दाहिनी- ४२

"नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये बेड कमी पडू लागले आहेत. मध्यंतरी अंत्यसंस्कारासाठी बेड मिळत नव्हते. मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये बेड वाढविले जाणार आहेत. तसेच पंचवटी, नाशिक रोड व सिडको विभागातील अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसविली जाणार आहे."

- डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT