Adimaya Saptshringi temple with Shivashaktamaya Aaras made of flowers and vine leaves and Idol of Ashutosh Mahadev in the gabhara
Adimaya Saptshringi temple with Shivashaktamaya Aaras made of flowers and vine leaves and Idol of Ashutosh Mahadev in the gabhara esakal
नाशिक

Saptashrungi Devi Gad : आदिमाया सप्तशृंगीचे मंदिर शिवशक्तिमय; बेलाची पाने, आकर्षक फुलांची विलोभनीय आरास

सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Devi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी मातेची तिसऱ्या श्रावणी सोमवार (ता. ४)निमित्त शिवशक्तिरूपी पूजा बांधून बेलाची पाने व आकर्षक फुलांची विलोभनीय आरास करण्यात आली होती.

सप्तशृंगीमातेच्या मंदिराचे सोमवारी रुपडेच पालटले होते. श्रावणी सोमवारनिमित्त शंभू महादेवाला प्रिय असणाऱ्या बेल पानांची व विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट केली होती. (saptashrungi devi gad Attractively decorated with bel leaves and various colored flowers nashik news)

देवीचा गाभारा, मंदिर कमान, झुंबराची आकर्षक फुलांची आरास साकारली होती. नाशिक येथील डेकोरेटर अवधूत देशपांडे यांनी सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, मंदिर विभागप्रमुख प्रशांत निकम, सुनील कासार व पुरोहितांच्या सहकार्याने आरास केली होती.

सजावटीसाठी ३० कॅरेट झेंडू व इतर फुले, पाच हजार बेलाची पाने, १० किलो गुलछडी आदींचा वापर करून इकोफ्रेंडली आरास केली. आराससाठी अवधूत देशपांडे, हेमानी जेठवा, वीरू कदम, राम धोंगडे आदींसह १० कर्मचाऱ्यांना पाच तासांचा कालावधी लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री भगवतीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस श्री शम्बो महादेवांची फुले व पानांनी साकारलेली भव्य दिव्य मूर्ती त्यावर कुंभातून मूर्तीवर पंचामृत धारेने महाभिषेकाचे सफेद फुल माळांनी साकारलेले दृश्य, त्यात आदिमायेस पांढऱ्या शुभ्र रंगाचे नेसवलेले महावस्त्र, सोन्या-चांदीचे आभूषणे, तसेच आदिमायेच्या ललाटी बेलाच्या पानाची प्रतिकृती असलेले कुंक, भाविकांचा ‘हर हर महादेव’ व आदिशक्ती भगवतीचा जयघोषामुळे आदिमायेचे मंदिर परिसर शिवशक्तिमय झाले होते.

मंदिरातील श्री भगवतीच्या मूर्तीशेजारी असलेले आशुतोष महादेवांच्या मूर्तीवर अभिषेक महापूजा करून मूर्तीला साजशृंगार करण्यात आला होता. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथून तिसऱ्या श्रावणी सोमवारची फेरी व दर्शन घेऊन हजारो भाविक आदिमायेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT