JCB intruded into farmer's farm while laying drainage line in Darna river.
JCB intruded into farmer's farm while laying drainage line in Darna river. esakal
नाशिक

Nashik News : दारणा नदीत सांडपाण्याची वाहिनी? शेतकऱ्यांची परवानगी न घेताच शेतातून खोदाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदावरीसह उपनद्यांमध्ये थेट सांडपाणी टाकण्यास मनाई असताना भगूर गावाच्या बाजूला असलेल्या कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील विजयनगरमधून दारणा नदीत सांडपाण्याची (ड्रेनेज) वाहिनी टाकली जात आहे.

नदीत थेट पाणी न मिसळता फिल्टर बेड टाकला जाणार असल्याचा दावा कॅन्टोन्मेंट अभियंत्यांकडून केला जात असला तरी तेथेही जागा संपादित नसताना फिल्टर बेड कुठे टाकणार, असा सवाल पर्यावरणप्रेमींसह स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

यासंदर्भात कॅन्टोन्मेंट सह लोकप्रतिनिधींनी कानावर हात ठेवल्याने संशय अधिक बळावला असून, शासकीय यंत्रणाच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. (Sewage channel in contonment area Darna river Excavation from fields without taking permission of farmers Nashik News)

भगूर गावाला पर्याय म्हणून कॅन्टोन्मेंट हद्दीत विजयनगर वसाहत वाढली आहे. विजयनगरचा विस्तार थेट दारणा नदीपर्यंत भिडत आहे. कॅन्टोन्मेंटची हद्द असल्याने इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहे. त्यामुळे आडव्या पद्धतीने विकास होत आहे.

परंतु विकास होत असताना रस्ते, पाणी, आरोग्य, मलनिस्सारण व्यवस्था या प्रकारच्या पायाभूत समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालकसंस्था म्हणून कॅन्टोन्मेंन्ट बोर्डाची आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे तयार होत असलेले सांडपाणी शुध्द करण्यासाठी मलनिस्सारण केंद्र निर्माण करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सांडपाणी स्वच्छ करूनच पुढे नदी पात्रात सोडणे बंधनकारक आहे.

परंतु असे असताना विजयनगरच्या सैनिक सोसायटीपासून थेट ड्रेनेजलाइन टाकली जात असल्याने शासन यंत्रणेकडूनच निरी, राष्ट्रीय हरित लवाद व केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनांचे उल्लंघन केले जात असल्याचे स्पष्ट होते.

सैनिक सोसायटी ते दारणा नदी किनाऱ्यापर्यंत खोदाई करताना शेतकऱ्यांच्या शेतातून विनापरवानगी खोदाई केली जात आहे. तीन फुटाच्या खाली परवानगीची आवश्‍यकता नसल्याचे पोलिस व कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ठेकेदाराकडून सांगितले जाते.

"ड्रेनेजलाइन थेट नदीला जोडता येत नाही. कॅन्टोन्मेंट किंवा अन्य सरकारी यंत्रणेकडून असा प्रकार होत असेल तर गंभीर बाब आहे. न्यायालयात दाखल गोदावरी पुनर्जीवन याचिकेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला जाईल."

- राजेश पंडित, याचिकाकर्ते, गोदावरी व उपनद्या पुनर्जीवन.

"आमदार निधीतून ड्रेनेजचे काम होत असून कॅन्टोन्मेंटचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. ड्रेनेजचे काम असले तरी नदी किनारी फिल्टर बेड टाकला जाणार आहे."- पियुष पाटील, कनिष्ठ अभियंता, कॅन्टोन्मेंट बोर्ड.

"शेतकऱ्यांच्या जागेतून विनापरवानगी ड्रेनेजलाइन टाकल्या जात आहेत. फिल्टर बेड टाकला जात असला तरी त्यासाठी जागा हवी, बेडसाठी भूसंपादन होणे आवश्यक आहे, ते झाल्याचे ऐकिवात नाही." - स्थानिक शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT