onion
onion sakal
नाशिक

येवल्यात उन्हाळ कांदा आवकेत वाढ, बाजारभाव स्थिर

सकाळ वृत्तसेवा


येवला (जि. नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला, अंदरसूल आवारात उन्हाळ कांदा आवकेत वाढ झाली, तर बाजारभाव स्थिर होते.

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांत व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांदा आवक ६६ हजार ३०१ क्विंटल झाली. बाजारभाव १५० ते एक हजार ६०८ तर सरासरी एक हजार ७५ रुपये प्रतिक्विटल होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे उन्हाळ कांद्याची आवक ३२ हजार २९२ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव १५० ते एक हजार ४७१, तर सरासरी एक हजार ५० रुपये प्रतिक्विटल होते.

गव्हाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर होते. व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव एक हजार ७०० ते दोन हजार ५०० तर सरासरी दोन हजार १०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती. बाजरीची आवक ७५ क्विटल झाली. बाजारभाव एक हजार ९०० ते दोन हजार १५० तर सरासरी एक हजार ९५० रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर होते. हरभऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव तीन हजार ३५० ते चार हजार ६३८ तर सरासरी चार हजार २८९ रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली, तर बाजारभाव स्थिर होते. सोयाबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक २२७ क्विटल झाली. बाजारभाव चार हजार ते कमाल सहा हजार ७८१ तर सरासरी सहा हजार ३५० रुपयापर्यंत होते. मकाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर राहीले. मकाला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव २००० ते २३२५ तर सरासरी २२२५ रुपये प्रतिक्विटल पर्यंत होते. सप्ताहात मक्याची आवक २७१ क्विटल झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT