CNG
CNG  esakal
नाशिक

मनमोकळं : ‘सीएनजी’चा पुरवठा ऑनलाइन स्वरूपात करावा

सकाळ वृत्तसेवा

"शासनाचे धोरण आहे, की इंधननिर्मितीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे. फार दिवस आपण पेट्रोल, डिझेलवर अवलंबून राहायचे नाही. स्वयंनिर्मिती करून त्यास पर्याय उभे करणे, हे योग्य आहे. पण त्यासाठीची दिलेले पर्याय सीएनजी, एलपीजी व इलेक्ट्रिकलची निर्मिती त्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठीचे इन्स्टॉलेशन सेंटर मोठ्या संख्येने उभारले पाहिजे. ऑनलाइन पद्धतीने पुरवठा केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात साठवणूक क्षमता, यासाठीच्या पायाभूत सुविधा त्वरित उभारल्या पाहिजे तरच इंधननिर्मितीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो, असे मत आढाव पेट्रोलियमचे संचालक ॲड. मुकुंद आढाव यांनी व्यक्त केले."- निखिलकुमार रोकडे

(Supply of CNG should be done online interview of adv mukund adhav by nikhilkumar rokade nashik)

प्रश्‍न : आतापर्यंतचा प्रवास सांगा?

ॲड. मुकुंद आढाव : आम्ही मूळचे दसक-पंचक येथील. माझे एमकॉम, एलएलबी व डीटीएल म्हणजेच टॅक्सेशन लॉपर्यंत शिक्षण झाले आहे. सुरवातीपासूनच शेती आमचा मूळचा व्यवसाय होय. १९८९ पासून वकिली व्यवसाय पूर्ण वेळ सुरू केला.

२००५ पासून नोटरी सुरू केली. दसक-पंचक विविध कार्यकारी सोसायटीचा सध्या विद्यमान संचालक व माजी चेअरमन आहे. अध्यक्ष समस्त दसक गावकरी मंडळ, अध्यक्ष दसक-पंचक पीठ गिरणीमालक संघ व नाशिक पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनचा माजी उपाध्यक्ष आहे.

प्रश्‍न : आपण व्यवसायाकडे कसे वळलात?

ॲड. आढाव : दसक-पंचक व जुना सायखेडा रोड येथे माझ्या मालकीच्या जमिनी आहेत. जुना सायखेडा रोड व दसक-पंचक परिसरात जवळपास दोन किलोमीटर पेट्रोलपंप नव्हता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असे.

दसक येथे २०१२ मध्ये आढाव पेट्रोलियम हा पेट्रोलपंप सुरू केला. २०२२ ला जुना सायखेडा- टाकळी रोड येथे चंद्रभागा पेट्रोलियम हा दुसरा पंप सुरू केला. खरंतर या दोन्ही जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होत्या.

मी ती जागा डेव्हलप करावी व बिल्डिंग अथवा कमर्शिअल कॉम्प्लेक्स करावे, असं मला मित्रपरिवाराने सुचविले. त्यात मला अधिक आर्थिक फायदाही झाला असता.

पण मित्रपरिवार जोडणे व नागरिकांशी सतत संपर्कात राहणे, हा माझा स्वभाव असल्यामुळे मी पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे विशेष करून चंद्रभागा पेट्रोलियममुळे अनेकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी खूप चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली, याचे मला आत्मिक समाधान आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रश्‍न : सीएनजी व एलपीजी याबद्दल सांगा?

ॲड. आढाव : दसक गावातील आढाव पेट्रोलियममध्ये सप्टेंबर १९ पासून सीएनजीसाठी मान्यता मिळाली. सीएनजीमुळे मला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत कमी ज्वलनशील आहे. त्याचा धोका कमी आहे, तसेच सीएनजी हा स्वस्तही आहे. सीएनजीमुळे वाहनधारकांना एवरेज अधिक मिळतो. त्यामुळे सीएनजीसाठी अधिक मागणी आहे.

प्रश्‍न : सीएनजी उपलब्धतेबद्दल सांगा?

ॲड. आढाव : लिक्विड नॅचरल गॅस (एलएनजी)पासून सीएनजी बनविला जातो. सीएनजी वाटपाचा कोटा केंद्र शासनाने नियंत्रित केलेला आहे. त्याच्या निर्मितीसाठी मर्यादा आहे. विल्होळी येथे इन्स्टॉलेशन प्लांट आहे.

पण तेथेही काही मर्यादा आहेत. सीएनजी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होत नाही. वाहनांद्वारे (एलसीव्ही) त्याची वाहतूक करावी लागते. रोज सहा हजार किलोची विक्री आमच्या पंपामार्फत होते. आठ हजार किलो हा आम्हाला अपेक्षित आहे, पण तो उपलब्ध होत नाही.

प्रश्‍न : सीएनजीबद्दल अडचणी कशा दूर कराव्यात?

ॲड. आढाव : सीएनजी उपलब्धतेत अनियमितपणा असल्यामुळे गाड्यांची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. तीन- चार तास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त होतात. सीएनजीचा पुरवठा थेट पाइपलाइनद्वारे (ऑनलाइन) झाला तर त्याचा पुरवठा सुरळीत होईल.

एक गाडी संपली की दुसरी गाडी, त्यामुळे वेळ वाया जातो. ट्रान्स्पोर्टेशन खर्च वाढतो आणि त्याचा भार शेवटी वाहनधारकांवर पडतो. शासनाने त्वरित पुरवठा सुरळीत करण्यासाठी व्यापक स्वरूपात निर्णय घेणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT